मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Lockie Ferguson : डोकं फिरवणारा रेकॉर्ड… लॉकी फर्ग्युसनने चारही षटकं निर्धाव टाकली, टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच घडलं

Lockie Ferguson : डोकं फिरवणारा रेकॉर्ड… लॉकी फर्ग्युसनने चारही षटकं निर्धाव टाकली, टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच घडलं

Jun 17, 2024 10:32 PM IST

Lockie Ferguson four maidens in a match : पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने आपल्या कोट्यातील चारही षटके मेडन टाकली आहेत. त्याने ३ बळी घेतले.

Lockie Ferguson : डोकं फिरवणारा रेकॉर्ड… लॉकी फर्ग्युसनने चारही षटकं निर्धाव टाकली, टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच घडलं
Lockie Ferguson : डोकं फिरवणारा रेकॉर्ड… लॉकी फर्ग्युसनने चारही षटकं निर्धाव टाकली, टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच घडलं (PTI)

टी-20 विश्वचषक २०२४ चा ३९ वा सामना सोमवारी (१७ जून) न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला जात आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात एक अविश्वसनीय रेकॉर्ड घडला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने एक भन्नाट कारनामा करून दाखवला आहे.

पापुआ न्यू गिनीविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने आपल्या कोट्यातील चारही षटके मेडन टाकली आहेत. त्याने ३ बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो कसोटी खेळणारा राष्ट्रीय संघातील पहिला गोलंदाज ठरला आहे. फर्ग्युसनने चाड सोपर (१ धाव), चार्ल्स अमिनी (१७ धावा) आणि कर्णधार असद वाला (६ धावा) यांना बाद केले.

ट्रेंडिंग न्यूज

तत्पूर्वी,  पावसामुळे हा सामना एक तास उशिराने सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, हे दोन्ही संघ T20 विश्वचषकाच्या सुपर-८ च्या शर्यतीतून बाहेर आहेत, पण त्यांना स्पर्धेचा शेवट विजयाने करायचा आहे. या विश्वचषकात दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे.

न्यूझीलंडमध्ये एक बदल

नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन म्हणाला, "आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही नवीन विकेट आहे आणि येथे पाऊस पडत आहे. त्यामुळे आम्हाला प्रथम नव्या चेंडूचा पुरेपूर वापर करायला आवडेल. आम्हाला पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करायला आवडेल. जेम्स नीशमच्या जागी आमचा प्लेइंग इलेव्हन इश सोधी खेळेल.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंडचे प्लेइंग इलेव्हन: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मिचेल सँटनर, टिम सौदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.

पापुआ न्यू गिनीची प्लेइंग इलेव्हन: टोनी उरा, असद वाला (कर्णधार), चार्ल्स अमिनी, सेसे बाऊ, हिरी हिरी, चाड सोपर, किपलिन डोरिगा, नॉर्मन वेनुआ, अली नाओ, काबुआ मोरिया, सेमो कामिया.

WhatsApp channel