ENG vs AUS : धागे खोल दिये! लॉर्ड्सवर पावसानंतर लिव्हिंगस्टोन बरसला, मिचेल स्टार्कला धु-धु धुतलं, व्हिडीओ पाहा-liam livingstone hits mitchell starc 4 sixes and scored 28 run an over eng vs aus 4th odi highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ENG vs AUS : धागे खोल दिये! लॉर्ड्सवर पावसानंतर लिव्हिंगस्टोन बरसला, मिचेल स्टार्कला धु-धु धुतलं, व्हिडीओ पाहा

ENG vs AUS : धागे खोल दिये! लॉर्ड्सवर पावसानंतर लिव्हिंगस्टोन बरसला, मिचेल स्टार्कला धु-धु धुतलं, व्हिडीओ पाहा

Sep 28, 2024 08:37 AM IST

Eng vs Aus 4th ODI Highlights : प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर इंग्लंडने पावसाने प्रभावित ३९ षटकांत ५ गडी गमावून ३१२ धावांची मजल मारली. ॲडम झाम्पाने हॅरी ब्रूकची विकेट घेतल्यावर लिव्हिंगस्टोन फलंदाजीला आला.

ENG vs AUS : धागे खोल दिये! लॉर्ड्सवर पावसानंतर लिव्हिंगस्टोन बरसला, मिचेल स्टार्कला धु-धु धुतलं, व्हिडीओ पाहा
ENG vs AUS : धागे खोल दिये! लॉर्ड्सवर पावसानंतर लिव्हिंगस्टोन बरसला, मिचेल स्टार्कला धु-धु धुतलं, व्हिडीओ पाहा

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (२७ सप्टेंबर) मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने तुफानी खेळी केली. त्याने २७ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर इंग्लंडने पावसाने प्रभावित ३९ षटकांत ५ गडी गमावून ३१२ धावांची मजल मारली. ॲडम झाम्पाने हॅरी ब्रूकची विकेट घेतल्यावर लिव्हिंगस्टोन फलंदाजीला आला. यानंतर इंग्लंडच्या धावगतीला पंख फुटल्यासारखे वाटत होते. लिव्हिंगस्टोनने शानदार फलंदाजी केली आणि चेंडू बहुतांशी सीमारेषेबाहेरच ठेवला.

मिचेल स्टार्कवर हल्ला चढवला

डावाच्या शेवटच्या षटकात मिचेल स्टार्कची चांगलीच धुलाई झाली. लिव्हिंगस्टोनने षटकातील पहिल्या चेंडूवर लेग-साईडच्या दिशेने षटकार ठोकून या षटकाची सुरुवात केली. दुसरा चेंडू डॉट होता. पुढच्या तीन चेंडूंवर सलग ३ षटकार मारून स्टार्कवर दबाव आणला. लिव्हिंगस्टोनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून षटक आणि इंग्लिश डाव संपवला. तो ६२ धावा करून तो नाबाद राहिला.

२५ चेंडूत अर्धशतक 

यासोबतच लिव्हिंगस्टोनने लॉर्ड्सवर अवघ्या २५ चेंडूत वनडेमधले सर्वात जलद अर्धशतकही ठोकले. त्याने लॉर्ड्सवर एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या आंद्रे फ्लिंटॉफच्या (७) विक्रमाची बरोबरी केली. या ऐतिहासिक मैदानावर एका संघाकडून सर्वाधिक षटकार (१२) मारण्याचा विक्रमही इंग्लंडने केला.

दरम्यान, ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा १८६ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत स्वतःला कायम राखले. यजमान इंग्लंडने चौथी वनडे जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना अंतिम म्हणून खेळला जाणार आहे. शेवटची वनडे जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल.

ऑस्ट्रेलिया १२६ धावांत गारद

तत्पूर्वी, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा वनडे पावसामुळे ३९-३९ षटकांचा झाला. कमी षटकांत खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अजिबात चांगला ठरला नाही.

लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३९ २१३ केल्या. त्यांच्याकडून कर्णधार हॅरी ब्रूकने सर्वात मोठी खेळी खेळली आणि ५८ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८७ धावा केल्या.

३१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया पूर्णपणे निष्फळ दिसत होता. २४,४ षटकात इंग्लिश गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १२६ धावांवर ऑलआउट केले आणि १८६ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने २३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या.

तर मॅथ्यू पॉट्सने इंग्लंडकडून सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय ब्रेडन कार्सने ३ बळी घेतले. रेस्ट जोफ्रा आर्चरला २ आणि आदिल रशीदला १ विकेट मिळाली.

Whats_app_banner
विभाग