आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्जने जवळपास संपूर्ण संघ सोडून दिला आहे. त्यांनी केवळ दोनच खेळाडूंना आगामी आयपीएल २०२५ साठी रिटेन केले आहे. पंजाबच्या या रिटेन्शन यादीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण अशातच इंग्लंडच्या एका खेळाडूकडून पंजाबला मोठा धक्का मिळाला आहे.
कारण नुकतेच पंजाबने त्यांचा स्फोटक फिनीशर लियाम लिव्हिंग्स्टोनला रीलीज केले आहे. रिटेन्शन लिस्टनंतर लिव्हिंग्स्टोनने वादळी शतकी खेळी करत खळबळ उडवून दिली आहे.
इंग्लंडचा कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या शतकाच्या बळावर इंग्लंडने कॅरेबियन भूमीवर दुसरे सर्वात मोठे एकदिवसीय रनचेस केले.
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शुक्रवारी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. ज्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. लियाम लिव्हिंगस्टोनने ८५ चेंडूत १४५.७७ च्या स्ट्राइक रेटने १२४ धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.
त्याची ही खेळी या सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा पाया रचणारी ठरली. विशेष म्हणजे ६० चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने अवघ्या १७ चेंडूत पुढच्या ५० धावा करत आपले शतक पूर्ण केले, यावरून त्याच्या फलंदाजीची आक्रमकता दिसून येते.
लियाम लिव्हिंगस्टोनने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. लिव्हिंगस्टोनने आतापर्यंत ३९ आयपीएल सामने खेळले आहेत. या ३९ सामन्यांमध्ये त्याने १६२.४६ च्या स्ट्राईक रेटने ९३९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ३९ सामन्यात ९.१४ च्या इकॉनॉमीसह ११ विकेट्स घेतल्या आहेत.
लियाम लिव्हिंगस्टोन २०१९ ते २०२१ पर्यंत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. यानंतर तो २०२२ ते २०२४ पर्यंत पंजाब किंग्ज संघाचा भाग होता.
राजस्थान रॉयल्स: लियाम लिव्हिंगस्टोनने राजस्थान रॉयल्ससाठी ९ आयपीएल सामने खेळले आहेत. या ९ आयपीएल सामन्यांमध्ये त्याने १२५.८४ च्या स्ट्राइक रेटने ११२ धावा केल्या आहेत.
पंजाब किंग्स: लियाम लिव्हिंगस्टोनने पंजाब किंग्जकडून ३० आयपीएल सामने खेळले आहेत. या ३० आयपीएल सामन्यांमध्ये त्याने १६९.१२ च्या स्ट्राइक रेटने ८२७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश आहे.