LLC 2024 Auction : प्रवीण कुमार अनसोल्ड! ब्रेटली-फिंचसह या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, पाहा संपूर्ण यादी-legends league cricket 2024 auction list of unsold players in llc 2024 auction praveen kumar tim paine aaron finch ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LLC 2024 Auction : प्रवीण कुमार अनसोल्ड! ब्रेटली-फिंचसह या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, पाहा संपूर्ण यादी

LLC 2024 Auction : प्रवीण कुमार अनसोल्ड! ब्रेटली-फिंचसह या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, पाहा संपूर्ण यादी

Aug 30, 2024 12:49 PM IST

लेजेंड्स क्रिकेट लीगचा लिलाव आश्चर्यकारक ठरला आहे. लिलावात अनेक दिग्गजांना खरेदीदार मिळाला नाही. यात प्रग्यान ओझा, मनविंदर बिस्ला, बेन कटिंग, ब्रेट ली आणि तिलकरत्ने दिलशान या खेळाडूंचा समावेश आहे.

LLC 2024 Auction : प्रवीण कुमार अनसोल्ड! ब्रेटली-फिंचसह या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, पाहा संपूर्ण यादी
LLC 2024 Auction : प्रवीण कुमार अनसोल्ड! ब्रेटली-फिंचसह या दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही, पाहा संपूर्ण यादी

लिजेंड्स लीगचा पुढचा सीझन सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. LLC 2024 ही स्पर्धा २० सप्टेंबरपासून खेळली जाणार आहे. मात्र, या लीगपूर्वी खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते.

दिग्गजांच्या या लीगसाठी गुरुवारी लिलाव पार पडला. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर मोठी बोली लागली. पण क्रिकेट जगतातील काही दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही. LLC २०२४ मध्ये अनसोल्ड ठरलेल्या खेळाडूंची यादी खूपच आश्चर्यकारक आहे. कारण यामध्ये प्रवीणकुमार, ब्रेट ली यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत.

लेजेंड्स लीगच्या तिसऱ्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (२९ ऑगस्ट) झाला. या लीगमध्ये एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. यावेळी शिखर धवन आणि दिनेश कार्तिकसारखे स्टार खेळाडूही या लीगमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही.

LLC 2024 मध्ये हे खेळाडू ठरले अनसोल्ड

तिलकरत्ने दिलशान

दिनेश रामदिन

टिम पेन

आरोन फिंच

शॉन मार्श

मार्टिन गुप्टिल

तमीम इकबाल

हाशिम आमला

प्रॉस्पर उत्सेया

निकी बॉय

आरपी सिंग

ब्रेट ली

चेतन सूर्यवंशी

जेसी रायडर

टिम ब्रेसनन

जेम्स फ्रँकलिन

मॅट प्रायर

जस्टिन केम्प

उपुल थरंगा

विल्यम पोर्टरफिल्ड

काइल कोएत्झर

कॅमेरॉन व्हाईट

मोहम्मद अश्रफुल

ग्रॅम स्वान

माजिद हक

थिलन तुषारा

फरहान बेहरदिन

आलोक कपाली

करीम सादिक

बेन कटिंग

वुसी सिबांदा

लाहिरू थिरिमाने

एड जॉयस

टॉम कूपर

चमारा कापुगेदरा

वेव्हेल हाइंड्स

मायकेल क्लिंगर

शहरयार नफीस

कबीर अली

मिशेल मॅक्लेनघन

प्रवीण कुमार

सुलेमान बेन

काइल जार्विस

टॉड ॲस्टल

दिलहारा फर्नांडो

स्टीव्हन फिन

रायन साइडबॉटम

जॉन मूनी

चमारा सिल्वा

कॉलम फर्ग्युसन

हेन्री डेव्हिड्स

रिकार्डो पॉवेल

प्रेस्टन मोमसेन

देवेंद्र बिशू

रंगना हेराथ

प्रज्ञान ओझा

धम्मिका प्रसाद

स्वप्नील अस्नोडकर

जोनाथन कार्टर

दिमित्री मस्करेन्हास

सचित पाथीराणा

रॉबी फ्रायलिंक

रजत भाटिया

दिलरुवान परेरा

मनविंदर बिसला

महेला उदावत्ते