LLC 2024 Auction : लेजेड्स लीगमध्ये किती संघ खेळणार? या खेळाडूंवर लागली मोठी बोली, संपूर्ण यादी पाहा-legends league cricket 2024 auction list of sold players who is most expensive player in llc 2024 auction ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LLC 2024 Auction : लेजेड्स लीगमध्ये किती संघ खेळणार? या खेळाडूंवर लागली मोठी बोली, संपूर्ण यादी पाहा

LLC 2024 Auction : लेजेड्स लीगमध्ये किती संघ खेळणार? या खेळाडूंवर लागली मोठी बोली, संपूर्ण यादी पाहा

Aug 30, 2024 11:07 AM IST

लेजेंड्स लीग क्रिकेटच्या तिसऱ्या सत्राचा लिलाव गुरुवारी नवी दिल्लीत पार पडला. लिलावादरम्यान अनेक खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

LLC 2024 Auction : लेजेड्स लीगमध्ये किती संघ खेळणार? या खेळाडूंवर लागली मोठी बोली, संपूर्ण यादी पाहा
LLC 2024 Auction : लेजेड्स लीगमध्ये किती संघ खेळणार? या खेळाडूंवर लागली मोठी बोली, संपूर्ण यादी पाहा

लेजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी गुरुवारी (२९ ऑगस्ट) खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. लेजेंड्स लीग क्रिकेटचे हा तिसरा सीझन आहे. यामध्ये एकूण ६ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

हा लिलाव नवी दिल्लीत पार पडला, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध खेळाडूंचा सहभाग होता. LLC च्या लिलावात अनके दिग्गज खेळाडूंचा समावेश होता.

शिखर धवनने काही दिवसांपूर्वीच निवृत्ती घेतली होती. जून महिन्यात निवृत्त झाल्यानंतर दिनेश कार्तिकनेही अलीकडेच लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि दिनेश कार्तिक या लीगचा भाग असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, धवन आणि कार्तिकवर किती रुपयांची बोली लागली, याची माहिती समोर आलेली नाही.

साउथर्न संघ

एल्टन चिगुम्बरा - २५ लाख

हॅमिल्टन मसाकादझा - २३.२८ लाख

पवन नेगी - ४० लाख

जीवन मेंडिस – १५.६ लाख

सुरंगा लकमल – ३४ लाख

श्रीवत्स गोस्वामी - १७ लाख

हमीद हसन - २१ लाख

नॅथन कुल्टर नाईल - ४२ लाख

हैदराबाद

समिउल्ला शिनवारी - १८.५९५ लाख

जॉर्ज वर्कर - १५.५ लाख

इसुरु उडाना – ६२ लाख

रिकी क्लार्क - ३८ लाख

स्टुअर्ट बिन्नी - ४० लाख

जसकरण मल्होत्रा ​​- १०.५० लाख

चॅडविक वॉल्टन - ६० लाख

बिपुल शर्मा - १७ लाख

कॅपिटल्स

ड्वेन स्मिथ - ४७.३६ लाख

कॉलिन डी ग्रँडहोम - ३२.३६ लाख

नमन ओझा - ४० लाख

धवल कुलकर्णी – ५० लाख

ख्रिस मपोफू - ४० लाख

ओडिशा

केविन ओब्रायन - २९.१७ लाख

रॉस टेलर - ५०.३४ लाख

विनय कुमार - ३३ लाख

रिचर्ड लेव्ही - १७ लाख

दिलशान मुनवीरा - १५.५ लाख

शाहबाज नदीम – ३५ लाख

फिडेल एडवर्ड्स - २९ लाख

बेन लॉफलिन - २३ लाख

मणिपाल

शेल्डन कॉट्रेल - ३३.५६ लाख

डॅनियल ख्रिश्चन - ५६.९५ लाख

अँजेलो परेरा – ४१ लाख

मनोज तिवारी – १५ लाख

असाला गुणरत्ने – ३६ लाख

सॉलोमन मेयर - २८ लाख

अनुरीत सिंग - २७ लाख

अबू नाचिम - १९ लाख

अमित वर्मा - २६ लाख

गुजरात

लियाम प्लंकेट - ४१.५६ लाख

मोर्ने वॅन विक - २९.२९ लाख

लेंडल सिमन्स- ३७.५ लाख

असगर अफगान - ३३.१७ लाखे

जेरोम टेलर - ३६.१७ लाख

पारस खडका - १२.५८ लाख

सेक्कुगे प्रसन्ना - २२.७८ लाख

कमाउ लेवरॉक - ११ लाख

साइब्रांड - १५ लाख