Martin Guptill Scored 160 Runs In Legend 90 League : भारतात सध्या लिजेंड 90 लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात आज (१० फेब्रुवारी) न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने एकट्याने १६० धावांचा पाऊस पाडला. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हे सामने खेळले जात आहेत.
लिजेंड 90 लीग स्पर्धेत प्रत्येकी १५ षटकांचे सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेचा आठवा सामना छत्तीसगड वॉरियर्स आणि बिग बॉईज युनिकरी यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ३८ वर्षीय मार्टिन गुप्टीलने स्फोटक खेळी खेळली. त्या ३०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १६० धावा केल्या आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू आणि भारतीय देशांतर्गत क्रिकेटपटू लीजेंड 90 लीगमध्ये खेळत आहेत. लीगच्या ८व्या सामन्यात छत्तीसगड वॉरियर्सचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने करिष्माई खेळी खेळली.
त्याने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली आणि मैदानात सर्वत्र फटके खेळून धावा केल्या. मार्टिन गप्टिलने या सामन्यात केवळ ४९ चेंडूंचा सामना केला आणि ३२६.५३ च्या स्ट्राइक रेटने १६० धावा केल्या. मार्टिन गप्टिलच्या या खेळीत १२ चौकार आणि १६ षटकार होते.
मार्टिन गप्टिलने आपल्या खेळीने जुन्या आठवणी ताज्या केल्या. न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो अशीच फलंदाजी करत असे.
मार्टिन गप्टिलच्या या दमदार खेळीमुळे छत्तीसगड वॉरियर्स संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. छत्तीसगड वॉरियर्सने १५ षटकात एकही विकेट न गमावता २४० धावा केल्या, ही या लीगमधील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यावेळी ऋषी धवननेही मार्टिन गप्टिलला पूर्ण साथ दिली.
ऋषी धवनने ४२ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १८०.९५ च्या स्ट्राईक रेटने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. दुसरीकडे, बिग बॉईज युनिकरी संघाने डावात एकूण ६ गोलंदाजांचा वापर केला, मात्र एकही बळी घेता आला नाही.
हा सामना जिंकण्यासाठी बिग बॉईज युनिकरी संघाला २४१ धावांचे लक्ष्य गाठायचे होते. मात्र बिग बॉईज युनिकरीच्या संघाला हे मोठे लक्ष्य गाठता आले नाही. त्यांनी आपले दोन्ही सलामीवीर केवळ ४१ धावांत गमावले.
यानंतर ७० धावांपर्यंत मजल मारता मारता त्यांचे आणखी दोन फलंदाज तंबूत परतले. रॉबिन बिस्टने अर्धशतक झळकावले, पण ते विजयासाठी पुरेसे नव्हते. बिग बॉईज युनिकरी संघाला १५ षटकात ४ गडी गमावून १५१ धावाच करता आल्या, त्यामुळे छत्तीसगड वॉरियर्सने ८९ धावांनी सामना जिंकला.
संबंधित बातम्या