मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK : न्यूयॉर्क झालं, आता लाहोरमध्ये हरवणार… चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या दिवशी होऊ शकतो भारत-पाकिस्तान सामना, पाहा

IND vs PAK : न्यूयॉर्क झालं, आता लाहोरमध्ये हरवणार… चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या दिवशी होऊ शकतो भारत-पाकिस्तान सामना, पाहा

Jun 10, 2024 12:20 PM IST

India vs Pakistan in 2025 Champions Trophy : सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. घ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढचा सामना कधी होणार आहे, याबाबत जाणून घ्या.

India vs Pakistan in 2025 Champions Trophy
India vs Pakistan in 2025 Champions Trophy (PTI)

India vs Pakistan next Match : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये (९ जून)  भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांचा राहिला, दोघांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेतले. प्रथम फलंदाजी करणारा भारत अवघ्या ११९ धावांवर ऑलआऊट झाला होता, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी हातातून गेलेला सामना परत आणला.

ट्रेंडिंग न्यूज

भारत आणि पाकिस्तान यांच्यीतल हा रोमहर्षक सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला.

टीम इंडियाच्या अवघ्या ११९ धावा फलकावर पाहून पाकिस्तानी चाहते आणि त्यांचे माजी क्रिकेटपटू आनंदी झाले होते. तर भारतीय चाहत्यांनाही टीम इंडियाचा सहज पराभव होईल असे वाटत होते. कारण पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या ४८ चेंडूत केवळ ४८ धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत सामना फिरवला.

भारत-पाक सामना लाहोरमध्ये रंगणार?

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या थरारक लढतीनंतर पुढील सामना कधी आणि कोठे होणार, याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढचा सामना २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळवला जाईल.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीकडे सादर करण्यात आले आहे. वास्तविक, यजमान देश स्पर्धेचे प्रारूप वेळापत्रक आयसीसीकडे पाठवतो आणि त्यानंतर आयसीसी त्याला मान्यता देते. या रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. मात्र, सामन्यांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये प्रस्तावित आहे. जर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला गेली तर भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. मात्र, बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. हा निर्णय भारत सरकारच्या मान्यतेच्या अधीन आहे.

पाकिस्तान टी-20 वर्ल्डकपमधून जवळपास बाहेर?

भारताविरुद्ध ६ धावांनी पराभव झाल्यानंतर आता बाबर आझमचा संघ २०२४ च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. वास्तविक, या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी बाबरसेनेचा अमेरिकेकडून पराभव झाला होता. आता पाकिस्तानला पुढील सामने आयर्लंड आणि कॅनडासोबत खेळायचे आहेत. त्यांच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, पाकिस्तानला त्यांचे पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील आणि नंतर अमेरिकेच्या मोठ्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

टी-२० वर्ल्डकप २०२४