lahiru thirimanne car accident : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याचा कार अपघात झाला आहे. श्रीलंकेतील अनुराधापुरा येथील थिरापने परिसरात (१४ मार्च) हा अपघात झाला. त्याची कार एका मिनी ट्रकला धडकल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात थिरिमाने जखमी झाला असून गाडीचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
Video : यॉर्कर स्पेशलिस्ट बनला अर्जुन तेंडुलकर, मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीत खूपच सुधारणा, पाहा
अपघातग्रस्त गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गाडीच्या अवस्थेवरून अपघात किती भयंकर होता, याचा अंदाज लावता येतो. पण यात चांगली गोष्ट म्हणजे थिरिमानेला गंभीर दुखापत झालेली नाही. त्याला किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी थिरिमानेला तातडीने रुग्णालयात नेले.
लाहिरू थिरिमाने सध्या लेजेंड्स क्रिकेट ट्रॉफी २०२४ मध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. न्यूयॉर्क स्ट्रायकर्स दिलेल्या माहितीनुसार अपघातावेळी त्याचे कुटुंबियदेखील कारमध्ये उपस्थित होते, परंतु अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
लाहिरू थिरिमानेचा कार अपघात पाहून क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतची आठवण झाली. ३० डिसेंबर २०२२ रोजी पंतचा भीषण कार अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली, अपघात झाल्यापासून पंत आतापर्यंत क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकलेला नाही.
लाहिरू थिरिमानेने २०२३ च्या विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. गेल्या एक वर्षापासून या डावखुऱ्या फलंदाजाकडे संघाकडून दुर्लक्ष केले जात होते आणि त्यानंतर लाहिरूने निवृत्ती जाहीर केली होती.
लाहिरू थिरिमानेने २०१० साली भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. तो एक दिवसीय सामना होता. एका वर्षानंतर म्हणजेच २०११ मध्ये त्याचे कसोटी पदार्पण झाले. लाहिरू थिरिमानेने श्रीलंकेसाठी ४४ कसोटी, २७ एकदिवसीय आणि २६ टी-20 सामने खेळले. २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत थिरिमानेला श्रीलंका संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ चॅम्पियनही झाला होता.
संबंधित बातम्या