Kuldeep Yadav : कुलदीप यादवनं स्टंप तोडला! फलंदाज अवाक् झाला; व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Kuldeep Yadav : कुलदीप यादवनं स्टंप तोडला! फलंदाज अवाक् झाला; व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल!

Kuldeep Yadav : कुलदीप यादवनं स्टंप तोडला! फलंदाज अवाक् झाला; व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल!

Apr 13, 2024 03:29 PM IST

kuldeep yadav breaks stump : लखनौविरुद्ध दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने ३ बळी घेतले. यादरम्यान त्याने निकोलस पुरनला बोल्ड करत स्टंपचे दोन तुकडे केले.

kuldeep yadav breaks stump कुलदीप यादवनं स्टंप तोडला! फलंदाज अवाक् झाला; व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल!
kuldeep yadav breaks stump कुलदीप यादवनं स्टंप तोडला! फलंदाज अवाक् झाला; व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल!

आयपीएल २०२४ शुक्रवारी (१२ एप्रिल) लखनौ सुपरजायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १८.३ षटकार १७० धावा करत सामना जिंकला.

या सामन्यात दिल्लीकडून कुलदीप यादवने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. कुलदीप यादवने लखनौविरुद्ध ४ षटकांत २० धावा देत ३ बळी घेतले.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने ८व्या षटकात कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला. या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर चायनामॅन कुलदीपने आपली जादू दाखवली. डाव्या हाताच्या मनगटी फिरकीपटूने मार्कस स्टॉइनिसला इशांत शर्माकरवी झेलबाद केले. येथून कुलदीपच्या फिरकीचा करिष्मा सुरू झाला. यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर निकोलस पूरनला क्लीन बोल्ड करून खळबळ उडवून दिली.

कुलदीपने स्टंप तोडला

कुलदीप यादवने हा चेंडू थोडासा वेगाने टाकला, ज्यावर निकोलस पूरन फ्रंटफूटवर खेळायला गेला, पण चेंडू थोडासा फिरला आणि त्याच्या बॅट आणि पॅडमधून स्टंपवर आदळला. कुलदीप यादवच्या चेंडूवर स्टंप तुटल्यामुळे ही विकेट अधिक खास ठरली.

साधारणपणे वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर स्टंप तुटल्याचे पाहायला मिळते, मात्र येथे फारच दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. आता कुलदीप यादवने निकोलस पूरनला बोल्ड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निकोलस पुरननंतर कुलदीप यादवने लखनऊचा कर्णधार केएल राहुलला बाद करत तिसरा बळी मिळवला. राहुलचा झेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने घेतला.

दिल्लीचा दुसरा विजय

कुलदीप यादवच्या गोलंदाजीनंतर जॅक फ्रेझर मॅकगर्क (५५) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सने मोसमातील आपला दुसरा विजय नोंदवला. लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने १८.१ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले.

दिल्ली पॉइंट टेबलमध्ये आता ९व्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचवेळी, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्सचा संघ ५ सामन्यांमध्ये ३ विजय आणि दोन पराभवांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

Whats_app_banner