भारताने आशिया कप २०२३ जिंकला. या स्पर्धेत फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली. यामुळे त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. आशिया कपमधील शानदार कामगिरीनंतर चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव छतरपूरच्या गडा गावात असलेल्या बागेश्वर धाम मंदिरात पोहोचला. येथे त्याने बालाजीचे दर्शन घेतले आणि त्याचे गुरु पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
बागेश्वर धाम पीठाधीश्वरानेही यावेळी कुलदीप यादवला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलदीप यादवचे आई-वडील आणि बहीणही उपस्थित होते.
आशिया कपच्या आधी कुलदीप बागेश्वर धाम मंदिरात पोहोचला होता. त्यावेळचे त्याचे फोटो आणि व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. शुक्रवारी (२२ सप्टेंबर) दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
पण भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव यांना या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.