Kuldeep Yadav : कुलदीप यादवने इतिहास रचला, सर्वात कमी चेंडू टाकून घेतले ५० विकेट, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Kuldeep Yadav : कुलदीप यादवने इतिहास रचला, सर्वात कमी चेंडू टाकून घेतले ५० विकेट, पाहा

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने इतिहास रचला, सर्वात कमी चेंडू टाकून घेतले ५० विकेट, पाहा

Published Mar 07, 2024 03:49 PM IST

Kuldeep Yadav IND vs ENG : कुलदीप यादवने धर्मशाला कसोटीत शानदार गोलंदाजी करत कसोटी कारकिर्दीत ५० बळी पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवला गेला आहे.

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने इतिहास रचला, सर्वात कमी चेंडू टाकून घेतले ५० विकेट, पाहा
Kuldeep Yadav : कुलदीप यादवने इतिहास रचला, सर्वात कमी चेंडू टाकून घेतले ५० विकेट, पाहा (PTI)

India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला आहे. भारताकडून कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या.

सोबतच, कुलदीप यादवने एका खास यादीत स्थान मिळवले आहे. कुलदीपने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५० बळी पूर्ण केले आहेत. 

खरे तर, कुलदीने सर्वात कमी चेंडू टाकून कसोटीत ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. या बाबतीत तो कुलदीप पहिल्या क्रमांकावर आहे.  कुलदीपने त्याच्या कसोटी करिअरमध्ये आतापर्यंत १८७१ चेंडू टाकून ५० बळी पूर्ण केले. कुलदीपने या सामन्यात ७२ धावा देत ५ विकेट घेतल्या. कुलदीपने कसोटी करिअरमध्ये ४ वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे.

भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पाहिली तर कुलदीप ४३व्या क्रमांकावर आहे. या बाबतीत अनिल कुंबळे आघाडीवर आहे. कुंबळेने १३२ कसोटी सामन्यात ६१९ विकेट घेतल्या आहेत. तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.अश्विनने १०० कसोटी सामन्यांत ५०७ बळी घेतले आहेत. कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने १३१ सामन्यात ४३४ विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडच्या पहिल्या डावात २१८ धावा

इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. भारताकडून कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने ४ विकेट घेतल्या. आर अश्विन त्याचा १०० वा कसोटी सामना खेळत आहे. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. इंग्लंडच्या सर्व १० विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या.

इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. तर इंग्लंडचे इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. बेन डकेटने २७, जो रूट २६ आणि जॉनी बेयरस्टॉने २९ धावा केल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या