मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KS Bharat : केएस भरतचं धनुष्यबाण सेलिब्रेशन, शतक भगवान रामाला समर्पित केलं

KS Bharat : केएस भरतचं धनुष्यबाण सेलिब्रेशन, शतक भगवान रामाला समर्पित केलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 21, 2024 03:37 PM IST

KS Bharat Arrow Celebration : केएस भरतने आपले हे शतक भगवान रामाला समर्पित केले. सध्या देशात राममय वातावरण असताना केएस भरतचे हे शतक आणि सेलिब्रेशन दीर्घकाळ स्मरणात राहील.

KS Bharat Dedicated Century To Lord Ram
KS Bharat Dedicated Century To Lord Ram

KS Bharat Dedicated His Century To Lord Ram : सध्या संपूर्ण भारत देश राममय झाला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत. या भव्य कार्यक्रमासाठी विराट कोहली, एमएस धोनीसह अनेक क्रिकेटपटूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

या दरम्यान, भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत हादेखील राम भक्तीत तल्लीन झालेला दिसला. भारत अ संघाकडून खेळताना त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध ११६ धावांची शानदार खेळी खेळली. भरतने हे खास शतक भगवान श्री राम यांना समर्पित केले आहे. शतकानंतर खास धनुष्यबाण स्टाइलने सेलिब्रेशन केले.

खरं तर, केएस भरतच्या या खेळीमुळे भारत-अ संघाने इंग्लंड लायन्सविरुद्धचा हा सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले.

यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर कोना भरतने झुंजार शतक झळकावल्यानंतर प्रेक्षकांच्या दिशेने बाण मारल्यासारखे सेलिब्रेशन केले. भरतने आपले हे शतक भगवान रामाला समर्पित केले. सध्या देशात राममय वातावरण असताना केएस भरतचे हे शतक आणि सेलिब्रेशन दीर्घकाळ स्मरणात राहील.

केएस भरतला अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही, मात्र त्याने १६५ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने नाबाद ११६ धावा करून आपला टीम इंडियातील आपला दावा पक्का केला.

भरतने गेल्या वर्षी कसोटीत पदार्पण केले होते. २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. भरतने आतापर्यंत ५ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत.

भारत अ पराभवापासून वाचला

भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघासमोर ४९० धावांचे कठीण लक्ष्य होते. तिसऱ्या दिवसअखेर भारत अ साठी परिस्थिती खूपच गंभीर होती. चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ६ विकेट्स आणि भारत अ ला पराभव टाळण्यासाठी ३३१ धावांची गरज होती.

चौथ्या आणि शेवटच्या दिवशी पंचांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवसअखेर भारताने १२५ षटकांत ५ बाद ४२६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे भारत लक्ष्यापासून ६४ धावांनी मागे होता.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi