Krunal Pandya RCB Captain IPL 2025 : आयपीएल २०२४ साठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे खेळाडूंचा मेगा लिलाव पार पाडला. या मेगा ऑक्शनमध्ये एकूण १८२ खेळाडूंना खरेदी करण्यात आले. यावेळी अनेक खेळाडू आपल्या जुन्या फ्रँचायझींविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.
यामध्ये क्रुणाल पांड्या याचेही नाव आहे, जो आता आरसीबीचा भाग झाला आहे. याआधीच्या तीन हंगामात क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्स संघाचा सदस्य होता.
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टनंतर क्रुणाल आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाचे कर्णधारपद भूषवणार, अशी अटकळ बांधली जात आहे.
वास्तविक, मेगा लिलावापूर्वी आरसीबीने त्यांचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याला रिटेन केले नव्हते आणि लिलावातही त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. अशा परिस्थितीत आयपीएलच्या १८व्या हंगामासाठी आरसीबीला कर्णधाराची गरज आहे.
फ्रँचायझीने त्याचे प्री-सीझन कॅम्प बेंगळुरू येथे आयोजित केले आहे. कृणाल पांड्याही त्यात सामील झाला आहे.
सोमवारी आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये क्रुणाल पांड्या आरसीबीच्या जर्सीत दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, Top K is HERE! Pandya's got the aura... but you already know that'.
आरसीबीच्या या पोस्टवर जबरदस्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'पंड्याला कर्णधार बनवा.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘कॅप्टन कृणाल पंड्या.’
डावखुरा अष्टपैलू क्रुणालला आरसीबीने मेगा लिलावात ५.७५ कोटी रुपयांना विकत घेत त्यांच्या संघात समाविष्ट केले. पण त्याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा विशेष अनुभव नाही.
कृणालने ६ सामन्यात LSG चे कर्णधारपद भूषवले आहे, ज्यात संघाने फक्त ३ सामने जिंकले आहेत. अर्थात, क्रुणाल बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवत आहे आणि सध्याही तो हार्दिक पंड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये बडोद्याचे नेतृत्व करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, विराट कोहली पुन्हा एकदा आयपीएलच्या आगामी हंगामात आरसीबीचे नेतृत्व करताना दिसू शकतो. आयपीएल २०२१ नंतर त्याने कर्णधारपद सोडले. तो संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळेच फ्रँचायझी त्याला पुन्हा एकदा ही महत्त्वाची जबाबदारी देऊ शकते.
संबंधित बातम्या