KKR vs SRH : कोलकाताची प्रथम फलंदाजी, हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधील ४ परदेशी खेळाडू कोण? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs SRH : कोलकाताची प्रथम फलंदाजी, हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधील ४ परदेशी खेळाडू कोण? पाहा

KKR vs SRH : कोलकाताची प्रथम फलंदाजी, हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधील ४ परदेशी खेळाडू कोण? पाहा

Mar 23, 2024 07:21 PM IST

IPL 2024 KKR vs SRH Playing 11 : आयपीएल २०२४ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे.

PL 2024 KKR vs SRH Playing 11 : कोलकाताची प्रथम फलंदाजी, हैदराबादचे ४ परदेशी खेळाडूंमध्ये कोण-कोण? पाहा प्लेइंग इलेव्हन
PL 2024 KKR vs SRH Playing 11 : कोलकाताची प्रथम फलंदाजी, हैदराबादचे ४ परदेशी खेळाडूंमध्ये कोण-कोण? पाहा प्लेइंग इलेव्हन

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2024 : आयपीएल २०२४ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हैदराबाचा कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्यातील चुरस पाहायला मिळणार आहे. हे दोघे आयपीएलचे सर्वात महागडे खेळाडू आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को यानसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट सब: नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णदार), नितीश राणा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, मनीष पांडे, वैभव अरोरा, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.

पॅट कमिन्स SRH चे नशीब बदलणार?

तर सनरायझर्स हैदराबादने (SRH) यंदा नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे. हैदराबादने पॅट कमिन्सला आयपीएल लिलावात २०.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आणि थेट कर्णधार बनवले.

 

Whats_app_banner