आयपीएलच्या १८ व्या मोसमाला आजपासून (२२ मार्च) सुरुवात होत आहे. यंदाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे.
पण या सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वास्तविक, अजिंक्य रहाणेसोबत एक विचित्र घटना घडली. यानंतर तो हातात बॅट घेऊन टीम बसच्या मागे धावताना दिसला. अजिंक्य रहाणेचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. पण असे काय घडले? ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅप्टनला हातात बॅट घेऊन टीम बसच्या मागे धावावे लागले.
खरे तर कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू ईडन गार्डन्सवर सराव करून हॉटेलच्या दिशेने परतत होते. तेव्हा संघाची बस कर्णधार अजिंक्य रहाणे याच्याशिवायच निघू लागली. यानंतर अजिंक्य रहाणे हातात बॅट घेऊन बस पकडताना धावताना दिसत आहे.
आता अजिंक्य रहाणे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना हसू आवरता येत नाही. सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, आज आयपीएल हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनला होता. मात्र, यावेळी कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी अनुभवी अजिंक्य रहाणेवर असेल.
संबंधित बातम्या