भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला जात आहे. आज (२० सप्टेंबर) सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे.
दरम्यान, या सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया फलंदाजीला उतरली. संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी लवकर विकेट गमावल्या. त्यानंतर सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या होत्या.
पण कोहलीच्या एका निर्णयाने कोट्यवधी चाहत्यांची मनं निराश झाली आहेत. वास्तविक, विराट कोहली बाद नसतानाही त्याला तंबूत परतावे लागले. विराटच्या या निर्णयावर कर्णधार रोहित शर्माही विराट कोहलीच्या निर्णयावर नाराज दिसला.
टीम इंडियाचे दोन विकेट पडल्यानंतर विराट आणि गिल यांच्यातील भागीदारी बहरताना दिसत होती. दोघेही शानदारपणे फलंदाजी करत होते. पण २० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मेहदी हसन मिराजने विराट कोहलीला उत्कृष्ट चेंडू टाकला. ज्यावर कोहली बीट झाला आणि चेंडू पॅडवर आदळला.
यावर बांगलादेशी खेळाडूंनी जोरदार अपील केले. यावर अंपायरनेही लगेच बोट वर केले, यानंतर विराटने गिलशी हलक्याफुलका संवाद सादला आणि तंबूच्या दिशेने चालू लागला. म्हणजेच, विराटने रिव्ह्यू घेतला नाही.
पण विराट निघून गेल्यावर विराटची विकेट मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आली. तेव्हा बॉल आधी विराटच्या बॅटला लागला आणि नंतर पॅडवर लागल्याचे दिसून आले. पण रिव्ह्यू न घेतल्याने विराट बाद झाला. रिव्ह्यू न घेण्याच्या कोहलीच्या निर्णयावर कर्णधार रोहित शर्माही नाराज दिसला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ ३०८ धावांनी आघाडीवर होता. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला १४९ धावांवर गुंडाळले.
दुसऱ्या डावातही रोहित शर्मा लवकर बाद झाला. रोहित शर्माने ५ धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या जैस्वालने दमदार सुरुवात केली होती, मात्र यावेळी तो केवळ १० धावाच करू शकला. यावेळी गिलनेही चांगली सुरुवात केली आणि तो ३३ धावांवर नाबाद आहे. गिलला पंतची साथ मिळत आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३०८ धावांची आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने बांगलादेश संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्याने ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. शतक झळकावणाऱ्या फिरकी मास्टर अश्विननेही चांगली गोलंदाजी होती, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.
मात्र, जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने मने जिंकली. फलंदाजीत ८६ धावा करणाऱ्या जडेजाने २ विकेट्सही घेतल्या, याशिवाय आकाश दीप आणि सिराजनेही प्रत्येकी २ विकेट घेतल्या.