कालचा म्हणजे गुरुवारचा (४ जुलै) दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. काल टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचली आणि तिथून मुंबईत आली आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा जल्लोष सोहळा पार पडला. हे सगळे क्षण खूप खास होते.
आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या माँ तुझे सलाम गाताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओ खूप खास आहे. व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू दिसत आहेत, ज्यामध्ये विराट कोहली खूप पुढे दिसत आहे. यावेळी विराटच्या पाठीवर तिरंगा आहे. विराटच्या शेजारी हार्दिक पांड्या दिसत आहे. संपूर्ण टीम स्टेडियमला फेरी मारत होती. या दरम्यान वंदे मातरम हे गीत वाजवले जात होते.
विराट कोहली आणि हार्दिक पांड्या पूर्ण उर्जेने 'मां तुझे सलाम...वंदे मातरम' गाताना दिसत आहेत. यावेळी सर्व खेळाडू उत्साहाने भरलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ खरोखरच कोणालाही भावनिक करेल आणि उर्जा निर्माण करेल, असा आहे.
रोहित शर्मा आणि मी खूप दिवसांपासून ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आमचे स्वप्न नेहमीच विश्वचषक जिंकण्याचे होते. गेली १५ वर्षे आम्ही एकत्र खेळत आहोत आणि कदाचित रोहितला इतका भावूक होताना मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. तो रडत होता, मीही रडत होतो, आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज दररोज जन्माला येत नाही आणि तो जगातील आठवे आश्चर्य आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चक दे इंडियाच्या तालावर नाचून आनंद साजरा केला. मरीन ड्राइव्ह येथे ओपन-टॉप बसमध्ये विजय परेडनंतर भारतीय संघ रात्री ९ वाजता वानखेडे स्टेडियमवर पोहोचला. वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर रोहितने विराट कोहलीला आपल्यासोबत प्रेक्षक स्टँडकडे खेचले आणि दोघांनीही भांगडा केला.
दरम्यान, त्या आधी बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच मायेदशी परतू शकली नाही.
टी-२० वर्ल्डकप विजयाच्या ५ दिवसानंतर टीम भारतात परतली. यानंतर टीम इंडियाच्या चाहत्यांनी अगदी जल्लोषात आणि लाखोंच्या गर्दीने जमा होत स्वागत केले. आधी दिल्ली आणि नंतर मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होती.
संबंधित बातम्या