सॅम कॉन्स्टास हे नाव आता संपूर्ण भारताला माहीत झाले आहे. हे नाव आतापर्यंत ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेटमध्येच कुठेतरी चर्चिले जात होते. सॅम कॉन्स्टास सर्वप्रथम शेफिल्ड शील्ड या देशांतर्गत स्पर्धेतील एकाच सामन्यातील दोन्ही डावांत शतके झळकावून प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
त्यानंतर, त्याने बिग बॅश लीग (BBL 2024-25) मध्ये सिडनी थंडरसाठी तुफानी खेळी खेळून T20 क्रिकेटमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे, की सॅम कॉन्स्टास आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होऊ शकतो का?
१९ वर्षीय सॅम कॉन्स्टासच्या तुफानी फलंदाजीच्या शैलीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. सॅम कॉन्स्टन्स आयपीएल २०२५ मध्ये खेळणार नाही हे चाहत्यांसाठी खूप दुर्दैवी आहे. कारण त्याचे नाव मेगा लिलावाच्या यादीत समाविष्ट नव्हते.
पण चांगली गोष्ट अशी आहे, की त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली आहे आणि जर तो ही लय कायम ठेवण्यात यशस्वी झाला तर तो निश्चितपणे आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसू शकतो.
सॅम कॉन्स्टासने या वर्षी बिग बॅश लीगमधून त्याच्या T20 फ्रँचायझी कारकीर्दीची सुरुवात केली. तो सिडनी थंडरकडून खेळतो आणि दरम्यानच्या काळात BBL २०२४-२५ हंगामात, कॉन्टासने १७ डिसेंबर रोजी ॲडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध पहिला सामना खेळला.
आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने २७ चेंडूत ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि आपल्या संघाला २ गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सामन्यात त्याने अवघ्या २० चेंडूत ५० धावा पूर्ण करून इतिहासही रचला. तो बिग बॅश लीगच्या इतिहासात सिडनी थंडरसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज बनला.
संबंधित बातम्या