Viral Video : केएल राहुल आरसीबीमध्ये परतणार? तीन शब्दांत दिलेलं उत्तर व्हायरल, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : केएल राहुल आरसीबीमध्ये परतणार? तीन शब्दांत दिलेलं उत्तर व्हायरल, पाहा

Viral Video : केएल राहुल आरसीबीमध्ये परतणार? तीन शब्दांत दिलेलं उत्तर व्हायरल, पाहा

Updated Sep 16, 2024 01:49 PM IST

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याच्याशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल त्याची जुनी टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संपर्कात आहे.

केएल राहुल आरसीबीमध्ये परतणार? तीन शब्दांत दिलेलं उत्तर व्हायरल, पाहा
केएल राहुल आरसीबीमध्ये परतणार? तीन शब्दांत दिलेलं उत्तर व्हायरल, पाहा (AP)

आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. आयपीएलचे हे मेगा ऑक्शन नोव्हेंबरमध्ये होऊ शकते. या मेगा लिलावासाठी जवळपास सर्वच आयपीएल संघांनी आपापल्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, रोहित शर्मा, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांसारख्या बड्या खेळाडूंबाबत प्रचंड चर्चा सुरू आहे आणि या खेळाडूंबाबत विविध बातम्याही समोर येत आहे.

अशातच आता, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याच्याशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल त्याची जुनी टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संपर्कात आहे. केएल राहुलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये परतायचे आहे, असा दावाही केला जात आहे.

RCB बाबत केएल राहुल नेमकं काय म्हणाला?

केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघ सोडू शकतात. वास्तविक, केएल राहुल याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका चाहत्याने केएल राहुलला विचारले की, त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये परतायचे आहे का?

या प्रश्नाच्या उत्तरात केएल राहुल म्हणाला की, आशा आहे की असे होईल... तेव्हापासून केएल राहुलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पुनरागमन करण्याबाबत सतत अटकळ बांधली जात आहेत.

तसेच, केएल राहुल आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील संबंध चांगले नसल्याचेही मानले जात आहे. यामुळे केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स सोडणार असल्याची चर्चा अधिक जोर धरू लागली आहे.

वास्तविक, केएल राहुल याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग राहिला आहे. आरसीबी सोडल्यानंतर केएल राहुल आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला आहे.

त्याचवेळी, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विश्वास आहे की यावेळी केएल राहुल त्याच्या जुन्या संघांत म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये पुनरागमन करणार आहे.

दरम्यान, याविषयी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु असे मानले जात आहे की केएल राहुल त्याच्या जुन्या संघात पुनरागमन करू शकतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या