KL Rahul vs Rishabh Pant Wicket-Keeping Stats : जगातील सर्व सर्वोत्तम क्रिकेट संघ आणि क्रिकेट चाहते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना १९ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या स्पर्धेतील टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या १५ सदस्यीय संघात दोन यष्टिरक्षकांची निवड झाली आहे. यात पहिला केएल राहुल आणि दुसरा ऋषभ पंत आहे. हे दोघेही त्यांच्या फलंदाजी आणि यष्टिरक्षणाने संघात महत्त्वाची भूमिका बजावतात. दोघांच्या फलंदाजीसोबतच त्यांची यष्टीरक्षणाची आकडेवारीही चांगली आहे.
अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर फलंदाजाची संधी कोणाला मिळते हे पाहणे बाकी आहे. याआधी या दोन्ही यष्टिरक्षकांच्या यष्टीरक्षणाची आकडेवारी पाहणे योग्य ठरेल.
केएल राहुलने ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६८ वेळा फलंदाजांना बाद केले आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याने ५२ झेल घेतले आहेत. त्याने ५ स्टंपिंग केले आहेत. क्षेत्ररक्षक म्हणून केएल राहुलने ११ झेल घेतले आहेत.
तर ऋषभ पंतने ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २८ वेळा फलंदाजांना बाद केले आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याने २३ झेल घेतले आहेत आणि १ स्टंपिंग केले आहे. क्षेत्ररक्षक म्हणून ऋषभ पंतने ४ झेल घेतले आहेत.
केएल राहुलने ७७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९.१५ च्या सरासरीने २८५१ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
ऋषभ पंतने ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३.५० च्या सरासरीने ८७१ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा
संबंधित बातम्या