मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  स्ट्राईक रेटमुळे केएल राहुल, अय्यरसाठी टी-20 चे दरवाजे बंद? चहल-अश्विनचं पुनरागमनही कठीण

स्ट्राईक रेटमुळे केएल राहुल, अय्यरसाठी टी-20 चे दरवाजे बंद? चहल-अश्विनचं पुनरागमनही कठीण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 07, 2024 09:09 PM IST

India squad for Afghanistan T20 series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. पण केएल राहुल, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल आणि रवी अश्विन या खेळाडूंचा विचार करण्यात आलेला नाही.

Bengaluru: India's batters Shreyas Iyer and KL Rahul during the ICC Men's Cricket World Cup match between India and Netherlands, at M Chinnaswamy Stadium in Bengaluru, Sunday, Nov. 12, 2023. (PTI Photo/Shailendra Bhojak)(PTI11_12_2023_000285A)
Bengaluru: India's batters Shreyas Iyer and KL Rahul during the ICC Men's Cricket World Cup match between India and Netherlands, at M Chinnaswamy Stadium in Bengaluru, Sunday, Nov. 12, 2023. (PTI Photo/Shailendra Bhojak)(PTI11_12_2023_000285A) (PTI)

IND vs AFG T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी टी-20 वर्ल्डकपच्य दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. 

अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. पण केएल राहुल, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल आणि रवी अश्विन या खेळाडूंचा विचार करण्यात आलेला नाही. 

त्यामुळे भारतीय मॅनेजमेंटने या खेळाडूंसाठी टी-20 क्रिकेटचे दरवाजे बंद केले आहेत का?  या खेळाडूंच्या जागी नवीन पर्यायांचा शोध सुरू आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

वास्तविक, केएल राहुल, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि रवी अश्विन यांसारख्या खेळाडूंसाठी टी-20 संघाचे दरवाजे बंद झाल्याचे मानले जात आहे. या खेळाडूंसाठी टी-20 संघात पुनरागमन करणे मोठे आव्हान असणार आहे. आगामी आयपीएलमध्ये या खेळाडूंना आपला दम दाखवावा लागणार आहे.

केएल राहुल-श्रेयस अय्यरच्या स्ट्राइक रेटवर प्रश्चनिन्ह

विशेष म्हणजे, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या स्ट्राईक रेटवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सतत संधी मिळत असूनही केएल राहुल आणि श्रेयस अय्यर टी-20 फॉरमॅटशी जुळवून घेऊ शकले नाहीत, असे टीकाकारांचे मत आहे.

याच कारणामुळे या खेळाडूंना टी-20 मधून डच्चू दिला असून इतर पर्यायांचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. केएल राहुलने ७२ आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये १३९.१३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. तर श्रेयस अय्यरचा स्ट्राइक रेट १३६.१३ आहे.

चहलही संघाबाहेर बाहेर

याशिवाय युझवेंद्र चहलसाठीही आता टीम इंडियात पुनरागमन सोपे नसेल. वास्तविक, सध्या युझवेंद्र चहलचा पर्याय रवी बिश्नोई बनल्याचे मानले जात आहे. 

आकडेवारीनुसार युझवेंद्र चहलने ८० टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये चहलने ८.१९ इकॉनॉमी आणि २५.०९ च्या सरासरीने ९६ विकेट घेतल्या आहेत. तर रवी बिश्नोईने २१ टी-20 सामन्यांमध्ये ७.१५ च्या इकॉनॉमीसह ३४ बळी घेतले आहेत.

WhatsApp channel