Asia Cup 2023 : संजू की इशान? केएल राहुल बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? पाहा
asia cup 2023 wicket keeper for india : केएल राहुल दुखापतीमुळे आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांपैकी कोणाला संधी मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
sanju samson asia cup 2023 : आशिया कप 2023 उद्यापासून (३० ऑगस्ट) सुरू होत आहे. पण त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आशिया चषक 2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. राहुल पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.
ट्रेंडिंग न्यूज
केएल राहुलच्या अनुपस्थितीत इशान किशन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळेल, पण त्यानंतरही केएल राहुल परतला नाही तर संजू सॅमसनला संघात संधी मिळेल का?
वास्तविक, जर केएल राहुल संपूर्ण टूर्नामेंटमधून बाहेर पडला तर संजू सॅमसनला टीम इंडियाचा भाग बनवले जाऊ शकते. पण जर केएल राहुल तिसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त झाला तर संजू सॅमसनचा संघात येण्याचा मार्ग बंद होईल.
संजू सॅमसनला संधी मिळेल का?
संजू सॅमसन वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग होता. या दौऱ्यावरील वनडे मालिकेत संजूने एक अर्धशतक केले होते. त्यानंतर आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसनने चांगली फलंदाजी केली होती. पण यानंतरही संजू सॅमसनला आशिया कप संघात स्थान मिळवता आले नाही. आशिया कपच्या संघात केएल राहुल आणि ईशान किशन यांना यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले.
केएल राहुल आशिया कपसाठी परतला होता
केएल राहुल दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर होता. पण तरी मॅच फिट म्हणून केएल राहुलची आशिया चषक संघासाठी निवड झाली. पण आता केएल राहुल पहिल्या २ सामन्यात खेळणार नसल्याची बातमी आहे.
केएल राहुलच्या अनुपस्थितीत, इशान किशन पहिल्या दोन सामन्यांमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असेल, परंतु केएल राहुल संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला तर संजू सॅमसनसाठी दरवाजे उघडू शकतात. ३०ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होत आहे. मात्र, भारतीय संघ २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कँडीत होणार आहे.