मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul : केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर, द्रविडने सांगितले कारण

KL Rahul : केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर, द्रविडने सांगितले कारण

Aug 29, 2023 01:34 PM IST

kl rahul asia cup 2023 : टीम इंडियाचा विकेटकीपर केएल राहुल आशिया कपच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमधून बाहेर झाला आहे. कोच राहुल द्रविडने ही माहिती दिली आहे.

KL Rahul
KL Rahul (REUTERS)

kl rahul ruled out for 2 matches asia cup : आशिया चषक 2023 गुरुवारपासून (३० ऑगस्ट) सुरू होत आहे. त्याआधीच भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आशिया कपमधील सुरुवातीचे दोन सामने खेळणार नाही. हेड कोच राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली आहे.

द्रविडने सांगितले की, केएल राहुल आशिया कप 2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने X (Twitter) वर याबाबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

बीसीसीआयने केएल राहुलबाबत X वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राहुल द्रविडचे वक्तव्य शेअर करण्यात आले आहे. केएल राहुलबद्दल द्रविड म्हणाला, "केएल राहुलची प्रगती खूप चांगली आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यात तो खेळू शकणार नाही. आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तान आणि नेपाळ यांच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये केएल राहुल खेळणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

केएल राहुल दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात परतला आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर होता. पण तरीही त्याला आशिया कपसाठी टीम इंडियात जागा मिळाली. प्रशिक्षक द्रविडसह व्यवस्थापनाचे राहुलच्या फिटनेसवर पूर्ण लक्ष आहे. या कारणास्तव तो पहिल्या दोन सामन्यांचा भाग असणार नाही.

तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर आहे. अय्यरही दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात परतत आहे. अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याने मॅच फिटनेसचे सर्व मापदंड पूर्ण केले आहेत.

टीम इंडिया श्रेयस अय्यरला २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकते. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. कर्णधार रोहित शर्मासोबत या सामन्यात शुभमन गिल सलामी करू शकतो. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतो.

WhatsApp channel