आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण असेल हा संघ व्यवस्थापन आणि क्रिकेट तज्ज्ञांसंमोरील मोठा प्रश्न आहे. संघात केएल राहुल आणि फाफ डु प्लेसिससारखे लीडर आहेत.
पण त्याआधी दिल्लीने ऋषभ पंत याला रिलीज करून अक्षर पटेल याला रिटेन केले आहे हे विसरून चालणार नाही. जर संघ एखाद्या खेळाडूवर एवढी गुंतवणूक करत असेल तर कुठेतरी त्यांनी अक्षरला कर्णधार बनवण्याचा विचार केला असेल. टीम इंडियाचे माजी सलामीवीर आणि सध्याचे तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी आगामी मोसमात डीसीचा कॅप्टन कोणीतरी व्हावा, याची चर्चा केली आहे.
आकाश चोप्रा याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले आहे की, "कॅप्टन कोण असेल? त्यांची परिस्थिती केकेआरसारखीच आहे. तो अक्षर पटेल असू शकतो. तो कर्णधार होण्यास माझी हरकत नाही. जर तुम्ही मला पर्याय दिलात तर मी म्हणेन की अक्षरला कर्णधार बनवा. तो अंडररेटेड राहिला आहे. पण तो खूप परिपक्व आहे आणि संघ चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाईल. तसेच, अशा खेळाडूला योग्य सन्मान मिळेल.
१४ कोटी रुपये खर्च करून केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील करण्यात आले आहे, हा देखील या लिलावातील सर्वोत्तम सौदा असल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची बोली २६ कोटींच्या पुढे गेली असताना केएल राहुलसारख्या खेळाडूला केवळ १४ कोटी मिळाले, हा संघासाठी फायद्याचा सौदा म्हणावा लागेल.
पण केएल राहुल हा दुसरा पर्याय असू शकतो. तिसरा पर्याय फाफ डु प्लेसिस असू शकतो, पण त्यांना सुरुवातीपासूनच फाफला खेळवता येणार नाही, कारण त्यांनी जॅक फ्रेजर-मॅकगर्कसाठी राईट टू मॅच कार्ड वापरले आहे. त्यामुळे मी अक्षर आणि राहुल यांच्यापैकी एकाचा विचार करत आहे, पण टीम मॅनेजमेंटने अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. अक्षरची या मैदानावरील कामगिरी अपवादात्मक असल्याने माझे मत अक्षरच्या बाजूने आहे. "