अलीकडेच लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा कर्णधार केएल राहुल याला संघातून रिलीज केले. यानंतर केएल राहुल आयपीएल मेगा लिलावाचा भाग असेल. आयपीएल मेगा लिलावात राहुलवर चॅलेंजर्स बेंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स हे मोठा पैसा खर्च करू शकतात, असे मानले जात आहे.
कारण या संघांना कर्णधाराची गरज आहे. आता आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी केएल राहुलने सांगितले आहे की, त्याला कोणत्या संघात जायचे आहे. त्याला संघाचे कर्णधारपद नको आहे, पण त्याने काही अटी ठेवल्या आहेत.
स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केएल राहुलने आपली इच्छा व्यक्त केली आहे. केएल राहुल म्हणाला की, मला अशा संघाचा भाग व्हायला आवडेल जे प्रेम, काळजी आणि आदर देते. कर्णधारपद हे माझे अजिबात प्राधान्य नाही.
पण या ३ गोष्टी पुरविण्यास सक्षम असलेल्या संघांचा भाग व्हायला मला आवडेल. तो म्हणाला की मी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. सलामीशिवाय मी मधल्या फळीत खेळतो, विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षणासाठी तयार आहे, पण याशिवाय माझ्यावर काही आणखी जबाबदारी आली तर मी त्यासाठीही तयार आहे.
केएल राहुल म्हणतो की, मी कधीही कुणाकडे जाऊन कर्णधारपदासाठी विचारणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माझे नेतृत्व कौशल्य खूप चांगले आहे आणि मी ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतो, ज्या प्रकारे मी स्वतःला हाताळतो आणि संघ हाताळतो त्यामध्ये तुम्हाला काहीतरी चांगले आढळले, तर ते कर्णधारपद ऑफर करू शकतात.
मी गेली काही वर्षे कर्णधारपद भूषवले आहे, जर तुम्हाला मला योग्य वाटले तर मला तसे करण्यात आनंद होईल. हे माझ्यासाठी काहीही बनवण्याबद्दल किंवा तोडण्याबद्दल नाही, मला फक्त अशा संघाचा भाग व्हायचे आहे ज्यामध्ये चांगले वातावरण आहे. तसेच, त्या फ्रेंचायझीमध्ये प्रत्येकाचा आदर केला जातो.