भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल सध्या दुखापतीशी झुंजत आहे. राहुलला आशिया कप 2023 साठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते, परंतु निगलमुळे तो स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार असून, हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. आता या सामन्याआधी भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्करांनी भारतीय मॅनेजमेंटला केएल राहुलचा पर्याय शोधण्यास सांगितले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना अनुभवी गावस्कर म्हणाले की, “मला असे वाटते की त्याला त्याच फिजिओकडून उपचार चालू ठेवायचे आहेत ज्याने एनसीएमध्ये त्याची काळजी घेतली. पण नंतर होय, मला वाटते की ही एक कठीण परिस्थिती असेल कारण तो ५ सप्टेंबरपूर्वी कोणताही सामना खेळणार नाही, मग तुम्ही त्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन कसे कराल? कारण सराव सामने ही एक गोष्ट आहे आणि मॅच फिटनेस ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे निवड समितीसाठी हा निर्णय कठीण असेल असे मला वाटते.
पुढील सल्ला देताना गावस्कर म्हणाले की, निवडकर्त्यांना राहुलच्या पलीकडे पाहावे लागेल. गावसकर म्हणाले की, तो एक दर्जेदार खेळाडू आहे, पण सामन्यात त्याची कामगिरी दिसली नाही तर अवघड होऊ शकते. त्याचा पर्याय शोधणे महत्वाचे आहे.'
अनुभवी गावस्कर पुढे म्हणाले, “तुम्ही त्याच्यासोबत रिस्क घेऊ शकत नाही. मी त्याला घेण्याच्या बाजूने आहे कारण तो एक दर्जेदार खेळाडू आहे. पण विश्वचषक संघ जाहीर होण्यापूर्वी तो सामन्यात खेळू शकेल की नाही हे स्पष्ट झाले पाहिजे, नाही तर मला वाटते की विश्वचषक संघात राहुलला ठेवणे कठीण होईल".