KL Rahul : केएल राहुलचे करिअर घडवण्यासाठी टीम इंडियाने या ३ खेळाडूंचा बळी दिला, तरी फायदा झाला नाही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul : केएल राहुलचे करिअर घडवण्यासाठी टीम इंडियाने या ३ खेळाडूंचा बळी दिला, तरी फायदा झाला नाही

KL Rahul : केएल राहुलचे करिअर घडवण्यासाठी टीम इंडियाने या ३ खेळाडूंचा बळी दिला, तरी फायदा झाला नाही

Oct 24, 2024 03:20 PM IST

KL Rahul Stats And Records : पुणे कसोटीसाठी केएल राहुलला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. तेव्हापासून केएल राहुलच्या कारकिर्दीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

KL Rahul : केएल राहुलचे करिअर घडवण्यासाठी टीम इंडियाने या ३ खेळाडूंचा बळी दिला, तरी फायदा झाला नाही
KL Rahul : केएल राहुलचे करिअर घडवण्यासाठी टीम इंडियाने या ३ खेळाडूंचा बळी दिला, तरी फायदा झाला नाही (PTI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ ऑक्टोबर) गुरुवारपासून पुण्यात खेळला जात आहे. या कसोटीसाठी केएल राहुलला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. तेव्हापासून केएल राहुलच्या कारकिर्दीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे की, आता केएल राहुलसाठी भारतीय संघात पुनरागमन करणे सोपे जाणार नाही. भारतीय कसोटीत केएल राहुलला चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि मयंक अग्रवाल यांसारख्या अनुभवी फलंदाजांपेक्षा अधिक प्राधान्य देण्यात आले होते, परंतु हा फलंदाज फायदा उठवू शकला नाही.

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा बराच काळ भारतासाठी कसोटी फॉरमॅट खेळत राहिला, पण आता तो बऱ्याच काळापासून मैदानाबाहेर आहे. असे मानले जाते की केएल राहुल याला चेतेश्वर पुजारापेक्षा जास्त संधी मिळाल्या, परंतु तो संधींचा फायदा घेऊ शकला नाही.

कसोटी फॉरमॅटमध्ये केएल राहुलला ओपनिंगपासून मधल्या फळीपर्यंत अनेक क्रमांकावर खेळण्याची संधी दिली गेली, परंतु त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.

अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघात खेळत राहिला, पण सध्या तो बाहेर आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरी संमिश्र होती. या फलंदाजाने परदेशी भूमीवर अनेक चांगल्या खेळी खेळल्या.

तसेच, असेही बोलले जाते की, केएल राहुल याला संधी देण्यासाठी अजिंक्य रहाणेला कसोटी संघातून डच्चू देण्यात आला, परंतु केएल राहुल संधीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला. मात्र, आता भारतीय संघात केएल राहुलचे भवितव्य काय आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मयंक अग्रवाल

मयंक अग्रवाल याची कसोटी कारकीर्द भलेही छोटी राहिली असेल, पण या खेळाडूने खूप प्रभावित केले आहे. खासकरून, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मयंक अग्रवालने चांगली खेळी केली होती, पण सध्या तो भारतीय संघाचा भाग नाही.

केएल राहुलला जितक्या संधी मिळाल्या, तितक्या संधी मयंक अग्रवालला मिळाल्या नाहीत, असे क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केएल राहुलला कसोटी फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या क्रमांकावर संधी मिळाली, पण त्याने निराशा केली.

Whats_app_banner