india vs australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी (२१ सप्टेंबर) पहिला वनडे सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पण केएल राहुल कर्णधार म्हणून फ्लॉप ठरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलची बॅट नेहमची शांत राहिली आहे. तसेच, कर्णधार म्हणूनदेखील केएल राहुलची आकडेवारी चांगली नाही.
आकडेवारी दर्शवते की केएल राहुलने आतापर्यंत ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. पण फलंदाज म्हणून केएल राहुलची आकडेवारी चांगली नाही. केएल राहुलने कर्णधार म्हणून ७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११५ धावा केल्या आहेत. या काळात केएल राहुलची सरासरी १९.१६ होती तर त्याचा स्ट्राइक रेट ६८.८६ होता. त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ ५५ धावा आहे.
मात्र, केएल राहुलची वनडे कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. केएल राहुलने आतापर्यंत ५८ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी २१५५ धावा केल्या आहेत. या काळात केएल राहुलची सरासरी ४६.८५ होती तर त्याचा स्ट्राइक रेट ८६.७९ होता. केएल राहुलने वनडे फॉरमॅटमध्ये ६ शतके झळकावली आहेत. याशिवाय केएल राहुलने वनडे फॉरमॅटमध्ये १३ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केएल राहुलची सर्वोच्च धावसंख्या ११२ आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. वास्तविक, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते.