मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG TEST : केएल राहुल की श्रेयस अय्यर? इंग्लंड कसोटी मालिकेत पाचव्या नंबरवर कोण खेळणार? पाहा

IND vs ENG TEST : केएल राहुल की श्रेयस अय्यर? इंग्लंड कसोटी मालिकेत पाचव्या नंबरवर कोण खेळणार? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2024 10:16 PM IST

IND vs ENG 1st TEST : कसोटी मालिकेत भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन निवडणे रोहित शर्मासाठी सर्वात कठीण काम असणार आहे. विशेषत: नंबर पाचवर कोणत्या फलंदाजाला संधी खेळवायचे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

IND vs ENG 1st TEST
IND vs ENG 1st TEST (PTI)

KL Rahul vs Shreyas Iyer : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी लकवरच टीम इंडिया तयारी सुरू करणार आहे.

दरम्यान, या कसोटी मालिकेत भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन निवडणे रोहित शर्मासाठी सर्वात कठीण काम असणार आहे. विशेषत: नंबर पाचवर कोणत्या फलंदाजाला संधी खेळवायचे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

श्रेयस अय्यर की केएल राहुल कोण खेळणार?

या नंबरसाठी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दावेदार आहेत.  त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट कोणावर विश्वास दाखवणार, हे पाहावे लागणार आहे. 

कारण केएल राहुल यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळला तर श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. पण जर केएल राहुल स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून खेळला तर श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे कठीण आहे.

आफ्रिका दौऱ्यावर श्रेयस अय्यरला दोन्ही कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली होती, कारण केएल राहुलने फलंदाजीसोबत विकेटकीपर म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. 

पण आता केएल राहुल फक्त फलंदाज म्हणून खेळला तर केएस भरतला विकेटकीपर म्हणून संघात घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर किंवा शुबमन गिल यांच्यापैकी एकाला बाहेर रहावे लागू शकते.

खरे तर भारतीय पीचेस या फिरकीला अनुकूल असतात. त्यामुळे केएल राहुलसाठी विकेटकीपिंग सोपं नसेल. यासाठी स्पेशलिस्ट विकेटकीपर म्हणून केएस भरतला संघात घेण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल भरतचा समावेश केला जाऊ शकतो. असे झाल्यास श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही.

श्रेयस अय्यर आणि केएल राहुलची आकडेवारी 

आकडेवारीनुसार श्रेयस अय्यरने भारतीय भूमीवर ७ कसोटी सामने खेळले आहेत. या ७ कसोटी सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने ३९.०९ च्या सरासरीने ४३० धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या नावावर १ शतक आहे. याशिवाय ३ अर्धशतके आहेत. त्याच वेळी, केएल राहुलने भारतीय भूमीवर १६ कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने ४०.१३ च्या सरासरीने ९२३ धावा केल्या आहेत. यात एका शतकाशिवाय ८ अर्धशतकांचा समावेश आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi