Kavya Maran : सनरायझर्स हैदराबाद आयपीएल फायनलमध्ये सुपर फ्लॉप, काव्या मारनवर मीम्सचा पाऊस
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Kavya Maran : सनरायझर्स हैदराबाद आयपीएल फायनलमध्ये सुपर फ्लॉप, काव्या मारनवर मीम्सचा पाऊस

Kavya Maran : सनरायझर्स हैदराबाद आयपीएल फायनलमध्ये सुपर फ्लॉप, काव्या मारनवर मीम्सचा पाऊस

May 26, 2024 09:51 PM IST

Cricket fans share memes on Kavya Maran : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्य हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादने खूपच निराशाजनक कामगिरी केली. यानंतर काव्या मारन यांच्यावर मीम्स बनत आहेत.

Cricket fans share memes on Kavya Maran
Cricket fans share memes on Kavya Maran

KKR vs SRH IPL 2024 FINAL, kavya maran : आयपीएलचा २०२४ चा अंतिम सामना (ipl finaL 2024) सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सुरू आहे. दोन्ही संघ चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आहेत.

या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पण केकेआरच्या गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला. मिचेल स्टार्कने तुफानी गोलंदाजी करत हैदराबादचे कंबरडे मोडले. हैदराबादचा डाव १८ षटकात ११३ धावांवर आटोपला. आता चॅम्पियन बनण्यासाठी केकेआरला ११४ धावा करायच्या आहेत.

दरम्यान, SRH च्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे त्यांचे चाहते खूपच निराश झाले. सनरायझर्स हैदराबादची टीम ओनर काव्या मारन (Kavya Maran Viral Reaction) देखील खूप दुःखी दिसत आहे. त्यांचे निराश फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काव्या मारनचे फोटो पाहून अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच, सोशल मीडिया युजर्स मीम्स बनवत आहेत.

या सामन्यात कोलकाताने पूर्ण वर्चस्व राखले आहे. हैदराबादचे खेळाडू एकापाठोपाठ एक बाद होत गेले. संघाची खराब कामगिरी पाहून काव्या मारन अजिबात खूश दिसत नाही. काव्याच्या रिअॅक्शन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याआीधीच्या सामन्यात म्हणजेच क्वालिफायर दोन सामन्यानंतर संघ जेव्हा अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा काव्या खूप आनंदी दिसत होती. त्याचवेळी आता तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून येते.

काव्या मारन कोण आहे?

काव्या मारन ही सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. ती २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबादची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनली आणि तिच्या वडिलांसोबत फ्रेंचायझीची सह-मालक आहे.

काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी आणि यूकेमधील वारविक बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी प्राप्त केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या