KKR vs SRH Dream 11 Prediction : आयपीएल फायलनमध्ये हैदराबाद-केकेआर आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs SRH Dream 11 Prediction : आयपीएल फायलनमध्ये हैदराबाद-केकेआर आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

KKR vs SRH Dream 11 Prediction : आयपीएल फायलनमध्ये हैदराबाद-केकेआर आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

May 26, 2024 12:56 PM IST

KKR vs SRH Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स भिडणार आहेत. दोन्ही संघातील हा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे

KKR vs SRH IPL Final Dream 11 Prediction
KKR vs SRH IPL Final Dream 11 Prediction (PTI)

KKR vs SRH IPL Final Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज रविवारी (२६) होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. केकेआर आणि हैदराबादने या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. आता दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.

केकेआरने पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादचा एकतर्फी पराभव करून फायनल गाठली. तर सनरायझर्स हैदराबादने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ३६ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

या मोसमात दोन्ही संघांची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली असून अंतिम सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याकडे केकेआरचे लक्ष असेल, तर हैदराबादला दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकायची आहे. 

दरम्यान, केकेआर असो की हैदराबाद, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर आणि फलंदाज

आयपीएल फायनलच्या ड्रीम इलेव्हन संघात, तुम्ही विकेटकीपर म्हणून हेनरिक क्लासेनची निवड करू शकता. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यात क्लासेनने महत्त्वाच्या वेळी अर्धशतक झळकावले. यानंतर, तुम्ही तुमच्या संघात ५ प्रमुख फलंदाजांचा समावेश करू शकता, यामध्ये ट्रॅव्हिस हेडचे नाव पहिले आहे. गेल्या एका वर्षात हेडची बॅट अंतिम सामन्यांमध्ये जोरदार बोलताना दिसली आणि या जेतेपदाच्या सामन्यातही तो असेच काहीसे करताना दिसू शकतो. 

यानंतर, आपण या हंगामात प्रभावित केलेल्या अभिषेक शर्माची निवड करू शकता, तर राहुल त्रिपाठीनेही गेल्या काही सामन्यांमध्ये आपल्या आक्रमक खेळाने आपली छाप सोडली आहे.

उर्वरित दोन मुख्य फलंदाजांपैकी तुम्ही श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांची निवड करू शकता, या दोन्ही खेळाडूंनी या हंगामात केकेआरसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ऑलराऊंडर

यानंतर तुमच्या ड्रीम ११ संघात तुम्ही सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश करू शकता. या दोघांनी बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली आहे. या मोसमात नारायणने बॅटने ४८२ धावा केल्या आहेत, बॉलिंगमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत, तर रसेलनेही १६ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. 

गोलंदाज

प्रमुख गोलंदाजांमध्ये तुम्ही पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती यांचा तुमच्या संघात समावेश करू शकता.

KKR विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या या अंतिम सामन्यासाठी तुम्ही ट्रॅव्हिस हेडला तुमच्या ड्रीम ११ संघाचा कर्णधार म्हणून निवडू शकता. कारण हेड फायनल सामन्यानंमध्ये तुफानी कामगिरी करतो. तर सुनील नारायणला उपकर्णधार म्हणून निवडू शकता जो तुम्हाला फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये गुण मिळवून देऊ शकेल.

KKR vs SRH Dream 11 Prediction

यष्टिरक्षक - हेनरिक क्लासेन.

फलंदाज - ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी.

अष्टपैलू - सुनील नरेन (उपकर्णधार), आंद्रे रसेल.

गोलंदाज - पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार.

Whats_app_banner