मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Final : आयपीएल फायनलमध्ये केकेआर-हैदराबाद भिडणार, या खेळाडूंमध्ये रंगणार खरी चुरस, पाहा

IPL 2024 Final : आयपीएल फायनलमध्ये केकेआर-हैदराबाद भिडणार, या खेळाडूंमध्ये रंगणार खरी चुरस, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 25, 2024 11:01 PM IST

kkr vs srh ipl 2024 final : आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स भिडणार आहेत. दोन्ही संघातील हा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

IPL 2024 Final : आयपीएल फायनलमध्ये केकेआर-हैदराबाद भिडणार, या खेळाडूंमध्ये रंगणार खरी चुरस, पाहा
IPL 2024 Final : आयपीएल फायनलमध्ये केकेआर-हैदराबाद भिडणार, या खेळाडूंमध्ये रंगणार खरी चुरस, पाहा

KKR vs SRH, IPL 2024 Final : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना रविवारी (२६ मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात पहिल्या क्वालिफायरमध्ये भिडलेले संघच पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाताने हैदराबादला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर त्यानंतर हैदराबादने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरी गाठली.

आता पुन्हा एकदा हे दोन संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. कोलकाता तिसऱ्या विजेतेपदाची तर हैदराबाद दुसऱ्या विजेतेपदाची वाट पाहत आहे.

दोन्ही संघ खूप मजबूत आहेत. हैदराबादची ताकद फलंदाजी आहे तर कोलकाता संघ समतोल आहे. दोन्ही संघात उत्कृष्ट खेळाडू आहेत. आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे आयपीएलची फायनल गाजवू शकतात.

मिचेल स्टार्क- ट्रॅव्हिस हेड

पहिल्या क्वालिफायरमध्ये हे दोन संघ आमनेसामने आले तेव्हा कोलकात्याच्या मिचेल स्टार्कने पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला बाद केले होते. स्टार्क आणि हेड दोघेही ऑस्ट्रेलियाचे आहेत. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्येही स्टार्कने हेडला खूप त्रास दिला आहे. यावेळी हेड स्टार्कचा कसा सामना करतो किंवा त्याच्या गोलंदाजीवर पुन्हा कसा आऊट होतो हे पाहायचे आहे.

पॅट कमिन्स- सुनील नरेन

कोलकाताने या संपूर्ण मोसमात सलामीवीर म्हणून सुनील नरेनचा वापर केला जो यशस्वीही ठरला. नरेनने तुफानी शैलीत फलंदाजी करत शतकही झळकावले. कमिन्सला आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव आहे. जगातील महान गोलंदाजांमध्ये त्याची गणना होते. नरेनला रोखण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. या लढतीकडेही सर्वांच्या नजरा असतील.

अभिषेक शर्मा- वैभव अरोरा

हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने यंदा अप्रतिम फलंदाजी केली आहे. हेडला रोखण्याची जबाबदारी स्टार्कवर असली तरी अभिषेकला रोखण्याची जबाबदारी वेगवान गोलंदाज वैभव अरोरावर असेल. वैभवने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे.

हेनरिक क्लासेन- वरुण चक्रवर्ती

दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हेनरिक क्लासेनने निर्णायक वेळी अर्धशतक झळकावून हैदराबादला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. त्यानंतरच हा संघ सामन्यात राहिला आणि विजय मिळवण्यात यशस्वी झाला. क्लासेनची झंझावाती फलंदाजी सर्वोत्तम गोलंदाजांसाठीही डोकेदुखी ठरली आहे. कोलकाता येथील वरुण आणि नरेन आपल्या गूढ फिरकीने त्याला रोखण्याचा प्रयत्न करतील.

आंद्रे रसेल- टी नटराजन

कोलकात्याचा आंद्रे रसेल खालच्या क्रमांकावर येऊन झटपट धावा करतो. त्याला रोखणे सोपे नाही. मात्र हैदराबादकडे त्यालाना रोखणारा एक गोलंदाज आहे. हा गोलंदाज टी नटराजन आहे. टी नटराेजनकडे उत्कृष्ट यॉर्कर चेंडू आहेत आणि अचूक यॉर्कर्स ही रसेलची कमजोरी आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४