IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ३१ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा २ विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २२३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानने ५० धावांत दोन विकेट गमावले. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन केवळ १२ धावा करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वालही १९ धावा करून माघारी परतला. पण रियान परागने ४ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने अवघ्या १४ चेंडूत ३४ धावा केल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक ६० चेंडूत नाबाद १०७ धावा केल्या, यात ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
दरम्यान, १० षटकांनंतर राजस्थान रॉयल्सच्या डावातील १० धावसंख्या ४ बाद १०९ धावा होती. राजस्थानला पुढील ६० चेंडूत ११५ धावा केल्या. पुढच्या ४ षटकात राजस्थानने केवळ १९ धावा केल्या. त्यावेळी राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. अखेरच्या ५ षटकात राजस्थानला ७९ धावांची गरज होती. मात्र, रोव्हमन पॉवेल आणि जोस बटलरने तुफानी फलंदाजीला सुरुवात केली. पॉवेलच्या १३ चेंडूत २६ धावांच्या खेळीमुळे आरआरच्या विजयाच्या आशा वाढू लागल्या. पण सुनील नरेनच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली.
राजस्थान रॉयल्सला अखेरच्या १२ चेंडूत २८९ धावांची गरज होती. एका बाजूने बटलर खिंड लढवत होता. राजस्थानने १९व्या षटकात १९ धावा कुटल्या. यामुळे अखेरच्या षटकात ९ धावांची गरज असताना जोस बटलरने राजस्थानच्या संघाला विजय मिळवून दिला. कोलकात्याकडून हार्षित राणा, सुनील नारायण, वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. तर, वैभव आरोराच्या खात्यात एक विकेट जमा झाली.
फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंह, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युजवेंद्र चहल.