IPL 2024: राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाल्याचे संजू सॅमसनने सांगितले. त्याचबरोबर या सामन्यात कोलकाता कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे. कोलकात्याच्या प्लेइंग ११ मध्ये चार परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला. यामध्ये फिल सॉल्ट, सुनील नरायण, आंद्रे रसेल आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. तर शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि ट्रेंट बोल्ट हे राजस्थानसाठी परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसतील.
ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी फिरकीपटू आणि मध्यम वेगवान गोलंदाजांना मदत करण्यासाठी ओळखली जाते. मात्र, यंदा या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात दोन्ही डावात २०० धावांचा टप्पा ओलांडला गेल्याने धावांचा ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स एकूण २८ वेळा आमनेसामने आले. यापैकी १४ सामने कोलकात्याने जिंकले. तर, राजस्थानला १३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला.यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर दोन्ही संघ एकमेकांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
आयपीएलच्या इतिहासात या मैदानावर खेळल्या गेलेल्या ८८ सामन्यांपैकी ३६ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. तर, ५२ सामने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांना गमवावे लागले आहेत. आरआरने ईडन गार्डन्सवर खेळलेल्या १० सामन्यांपैकी केवळ तीन सामने जिंकले आहेत.
फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकिपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
संबंधित बातम्या