मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs RR Live Streaming: कोलकात्यासमोर राजस्थानचे आव्हान; कधी, कुठे पाहायचा लाईव्ह सामना?

KKR vs RR Live Streaming: कोलकात्यासमोर राजस्थानचे आव्हान; कधी, कुठे पाहायचा लाईव्ह सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 16, 2024 10:09 AM IST

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ३१ व्या सामना खेळला जाणार आहे.

आयपीएल २०२४: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
आयपीएल २०२४: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ३१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स एकमेकांशी भिडणार आहेत.हा सामना कोलकाता येथील प्रतिष्ठित ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे आज अत्यंत रोमहर्षक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे पाहायला मिळणार, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

राजस्थान रॉयल्सने या मोहिमेत चमकदार कामगिरी करत आतापर्यंत खेळलेल्या सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. राजस्थाान प्रत्येक खेळाडू भूमिकेनुसार कामगिरी करत आहे. त्यांच्या लाइन- अपमधील कोणत्याही त्रुटी दर्शविणे खूप कठीण आहे. आरआरच्या आतापर्यंतच्या यशामागचे हे एक प्रमुख कारण आहे, कारण या सामन्यात खेळाडू कोणती भूमिका बजावतील हे माहित आहे आणि अशा प्रकारे संघाला हाताळण्यात व्यवस्थापनाने हुशारी दाखवली आहे.

RCB vs SRH : २६२ धावा करूनही आरसीबीचा पराभव, हैदराबादने २५ धावांनी सामना जिंकला; चिन्नास्वामीवर ५४९ धावांचा पाऊस

जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल आणि केशव महाराज या दोन्ही अनुभवी खेळाडूंसह आणि यशस्वी जैस्वाल, रियाल पराग, कुलदीप सेन आणि आवेश खान यांसारख्या युवा खेळाडूंसह वैयक्तिक प्रतिभा देखील चमकदार आहे. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधील सर्वच खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. दुसरीकडे, कोलकात्याचा संघही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोलकात्याचे ऑलराऊंडर आंद्रे रसेल आणि सुनील नारायण नेत्रदिपक कामगिरी करत आहेत. सुनील नारायण आणि फिल सॉल्ट यांनी आपल्या होम ग्राऊंडवर आतापर्यंत दमदार कामगिरी केली.

RCB vs SRH : २८७ धावा करूनही हैदराबादचा केवळ २५ धावांनी विजय, दिनेश कार्तिकच्या वादळी ८३ धावा

कधी, कुठे पाहायचा सामना?

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी (१६ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ३१ वा सामना खेळला जाईल. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ:

फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंह, अल्लाह गझनफर, साकिब हुसेन, शेरफान रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत, दुष्मंथा चमीरा.

राजस्थान रॉयल्सचा संघ:

संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, आबिद मुश्ताक, रविचंद्रन अश्विन, जोस बटलर, संदीप शर्मा, नांद्रे बर्गर, डोनोवन फरेरा, कुणाल सिंह राठौर.

IPL_Entry_Point