IPL 2025 KKR vs RCB : आयपीएल २०२५ चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जात आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.केकेआर प्रथम फलंदाजी करेल.
कोलकाता नाईट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फिल सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल.
आरसीबी आणि केकेआर यांच्यात अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. ज्यात KKR संघ थोडा पुढे दिसतो. दोन्ही फ्रँचायझींमध्ये एकूण ३५ सामने झाले आहेत. यापैकी केकेआरने २१ वेळा विजय मिळवला आहे. तर आरसीबीने १४ वेळा विजय मिळवला आहे. यात आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ३४ सामने खेळले गेले आहेत.
या दरम्यान, आरसीबीने १४ सामने जिंकले असून केकेआरने २० सामने जिंकले आहेत. चॅम्पियन्स लीगमध्ये एक सामना झाला, ज्यात केकेआरने मिळवला होता.
या सामन्याच्या टॉसआधी भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. भव्य उद्घाटन सोहळ्याची सुरुवात शाहरुख खान याने केली. यानंतर गायिका श्रेया घोषाल, अभिनेत्री दिशा पाटणी आणि करण औजला यांनी उद्घाटन समारंभात परफॉर्म केले. श्रेयाने 'मेरे ढोलना', 'आमी जे तोमर', 'नगाडा सांग ढोल' गाणी गाऊन चाहत्यांना नाचायला भाग पाडले.
यानंतर शाहरुखने रिंकू सिंग आणि विराट कोहलीला स्टेजवर बोलावले. रिंकू आणि विराटने शाहरुखसोबत डान्स केला.
संबंधित बातम्या