KKR vs RCB Playing 11 : ईडन गार्डन्सवर आज केकेआर-आरसीबी भिडणार, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs RCB Playing 11 : ईडन गार्डन्सवर आज केकेआर-आरसीबी भिडणार, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

KKR vs RCB Playing 11 : ईडन गार्डन्सवर आज केकेआर-आरसीबी भिडणार, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Published Mar 22, 2025 12:11 PM IST

KKR vs RCB predicted XI, IPL 2025 : श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ गेल्या मोसमात चॅम्पियन बनला होता. मात्र, यावेळी संघाची कमान अजिंक्य रहाणे याच्या हाती असेल, तर दुसरीकडे बेंगळुरूचे कर्णधारपद रजत पाटीदार याच्या खांद्यावर आहे.

KKR vs RCB : ईडन गार्डन्सवर आज केकेआर-आरसीबी भिडणार, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
KKR vs RCB : ईडन गार्डन्सवर आज केकेआर-आरसीबी भिडणार, अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

KKR vs RCB IPL 2025 : आयपीएल २०२५ चा उत्सव आजपासून (२२ मार्च) सुरू होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ गेल्या मोसमात चॅम्पियन बनला होता. मात्र, यावेळी संघाची कमान अजिंक्य रहाणे याच्या हाती असेल, तर दुसरीकडे बेंगळुरूचे कर्णधारपद रजत पाटीदार याच्या खांद्यावर आहे.

ईडन गार्डनची पीच रिपोर्ट

ईडन गार्डन्सची खेळपट्टी हाय स्कोअरिंग सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुरुवातीला फलंदाजी करणे सोपे आहे आणि फलंदाजी करणारा संघ डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. पण जसजसा चेंडू जुना होतो तसतशी फिरकीपटूंना मदत मिळू लागते.

ईडन गार्डनवर २०२४ च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने २६२ धावांचे लक्ष्य गाठले होते आणि केकेआरचा धुव्वा उडवला होता.

ईडन गार्डन्सची आकडेवारी

आयपीएलच्या इतिहासात ईडन गार्डन्सवर एकूण ९३ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ केवळ ३८ वेळा विजयी ठरला आहे. येथे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ५५ वेळा विजय मिळवला आहे. गेल्या ६ सामन्यांमध्येही पाठलाग करणाऱ्या संघाने येथे ४ वेळा विजय मिळवला आहे. केकेआरला ईडन गार्डन्सवर घरचा फायदा होईल, पण या सामन्यात नाणेफेकही मोठी भूमिका बजावू शकते.

आरसीबी-केकेआर संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा/रसिक दार सलाम.

कोलकाता नाईट रायडर्स : सुनील नरेन, किटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner