KKR Vs RCB IPL 2024 : केकेआरची प्रथम फलंदाजी, आरसीबीच्या संघात तीन मोठे बदल, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR Vs RCB IPL 2024 : केकेआरची प्रथम फलंदाजी, आरसीबीच्या संघात तीन मोठे बदल, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

KKR Vs RCB IPL 2024 : केकेआरची प्रथम फलंदाजी, आरसीबीच्या संघात तीन मोठे बदल, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Published Apr 21, 2024 03:09 PM IST

आयपीएल २०२४ मध्ये केकेआर आणि आरसीबी आमने सामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे.

KKR Vs RCB IPL 2024 : केकेआरची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
KKR Vs RCB IPL 2024 : केकेआरची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल २०२४च्या ३६ व्या सामन्यात आज (२१ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केकेआर आणि आरसीबी यंदा दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. या दोघांमधील पहिल्या सामन्यात केकेआरने बाजी मारली होती. 

आरसीबीने या सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये तीन बदल केले आहेत, तर केकेआरने संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅमेरून ग्रीन, मोहम्मद सिराज आणि कर्ण शर्मा यांचे आरसीबी संघात पुनरागमन झाले आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनीर नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज.

इम्पॅक्ट सब: सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशाक, स्वप्नील सिंग.

केकेआर वि. आरसीबी हेड टू हेड

केकेआर आणि आरसीबी या दोन्ही संघांमध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत ३३ सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाताने १९ आणि बेंगळुरूने १४ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये ११ सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाताने ७ आणि बेंगळुरूने ४ सामने जिंकले आहेत.

Whats_app_banner