KKR vs RCB Live Streaming: आरसीबीसमोर केकेआरचे आव्हान; कधी, कुठे पाहायचा सामना? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs RCB Live Streaming: आरसीबीसमोर केकेआरचे आव्हान; कधी, कुठे पाहायचा सामना? वाचा

KKR vs RCB Live Streaming: आरसीबीसमोर केकेआरचे आव्हान; कधी, कुठे पाहायचा सामना? वाचा

Apr 21, 2024 11:51 AM IST

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील ३६वा सामना खेळला जात आहे.

आयपीएल २०२४: आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
आयपीएल २०२४: आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. लीगमधील सर्व संघ आता त्यांचे शेवटचे सात सामने खेळतील. रविवारी (२१ एप्रिल २०२४) आज डबल हेडर सामना खेळला जाणार आहे. आज दुपारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडतील. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. कोलकात्याचा संघ त्यांचा सातवा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. तर, आरसीबीचा हा आठवा सामना असेल.

कोलकाता नाईट रायडर्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोलकात्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. तर, आरसीबीने खेळलेल्या सात सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत कोलकात्याचा संघ आठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर, आरसीबीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

KKR vs RCB Dream 11 Prediction : आज या ऑलराऊंडरला बनवा तुमचा कर्णधार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

कधी, कुठे पाहायचा सामना?

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी (२१ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ३६वा सामना खेळला जाईल. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

Impact Player Rule : हा नियम नाही तर खेळाडूंची बर्बादी… कसं ते झहीर खानने समजून सांगितलं, वाचा

कोलकात्याचा संघ:

फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, सुयश शर्मा, मनीष पांडे, अनुकुल रॉय, रहमानउल्ला गुरबाज, अल्लाह गझनफर, साकिब हुसैन, शेरफान रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत, दुष्मंथा चमीरा.

बंगळुरूचा संघ:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), महिपाल लोमरोर, अनुज रावत, विजयकुमार विषक, रीस टोप्ले, लॉकी फर्ग्युसन, यश दयाळ, यश दयाळ, स्वप्नील सिंह, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, आकाश दीप, राजन कुमार, टॉम करन, मयंक डागर, अल्झारी जोसेफ, कॅमेरॉन ग्रीन, मनोज भंडागे, हिमांशू शर्मा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग