IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील आगामी सामना रविवारी (२१ एप्रिल २०२४) ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. केकेआर या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात निराशाजनक कामगिरी करणारा आरसीबीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.
या हंगामाच्या पूर्वार्धात दोन्ही संघ आमनेसामने आले होते, या सामन्यात केकेआरने सात विकेट्सने आरसीबीचा पराभव केला. व्यंकटेश अय्यर (५० धावा), सुनील नारायण (४७ धावा) आणि श्रेयस अय्यर ( नाबाद ३९ धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर केकेआरने १६.५ षटकांत हा सामना जिंकला. सुरुवातीला पहिल्या डावात विराट कोहलीने आरसीबीकडून ५९ चेंडूत ८३* धावांची खेळी करत २० षटकांत ६ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. केकेआरकडून आंद्रे रसेल आणि हर्षितने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आतापर्यंत ३३ सामन्यांमध्ये आमनेसामने आले. यातील १९ सामन्यात कोलकात्याने बाजी मारली आहे. तर, आरसीबीने १४ सामन्यात विजय मिळवला.
ईडन गार्डन्सवरील खेळपट्ट्या फलंदाजीसाठी चांगल्या आहेत आणि गोलंदाजांना दबाव आणण्यासाठी विविधता आणणे आवश्यक आहे.
फिल सॉल्ट, सुनील नारायण, अंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर/नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अल्झारी जोसेफ, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज.