मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs RCB Dream 11 Prediction : आज या ऑलराऊंडरला बनवा तुमचा कर्णधार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

KKR vs RCB Dream 11 Prediction : आज या ऑलराऊंडरला बनवा तुमचा कर्णधार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 21, 2024 10:57 AM IST

KKR vs RCB Dream 11 Team : आयपीएल २०२४ मध्ये आज केकेआर आणि आरसीबी आमने सामने येणार आहे. दोन्ही संघांमधील सामना दुपारी ३:३० वाजता रंगणार आहे.

KKR vs RCB Dream 11 Team prediction आज या ऑलराऊंडरला बनवा तुमचा कर्णधार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम
KKR vs RCB Dream 11 Team prediction आज या ऑलराऊंडरला बनवा तुमचा कर्णधार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

आयपीएल २०२४च्या ३६ व्या सामन्यात (२१ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. या मोसमात खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांपैकी केकेआरने ४ मध्ये विजयाची चव चाखली आहे, तर २ मध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे, केकेआरला त्यांच्या शेवटच्या सामन्यात २२४ धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यात अपयश आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

आता केकेआर आणि आरसीबी यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा भिडणार आहेत. पहिल्या सामन्यात केकेआरने आरसीबीचा पराभव केला होता. अशा स्थितीत फाफ डु प्लेसिसची सेना पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 

दरम्यान, केकेआर असो की आरसीबी, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपरसाठी सर्वोत्तम कोण?

यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक आणि फिल सॉल्ट हे सर्वोत्तम पर्याय असतील. कार्तिकची बॅट या मोसमात चांगलीच बोलते आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कार्तिकने ३५ चेंडूत ८३ धावांची स्फोटक खेळी केली होती.

फलंदाज

विराट कोहली, श्रेयस अय्यर, फाफ डू प्लेसिस, आंगक्रिश रघुवंशी हे फलंदाजीत सर्वोत्तम पर्याय असतील. आयपीएल २०२४ मध्ये कोहलीची बॅट चांगली कामगिरी करत आहे. विराटच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. यासोबतच, अंगक्रिशनेही आपल्या फलंदाजीने छाप पाडली आहे.

अष्टपैलू 

तुमच्या ड्रीम-११ संघात तुम्ही सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना अजिबात मिस करू शकत नाही. नरेनची बॅट यंदाच्या मोसमात चांगलीच चालत आहे. गेल्या सामन्यात नरेनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक झळकावले होते. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्याने २ बळी घेतले. रसेलचा दिवस चांगला असल्यास, तो एकट्याने तुम्हाला मालामाल करू शकतो.

गोलंदाज 

गोलंदाजीत मिचेल स्टार्क, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल हे त्रिकूट ईडन गार्डन्स मैदानावर प्रभावी ठरू शकतात. केकेआरच्या घरच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळते, ज्याचा फायदा हे गोलंदाज घेऊ शकतात.

KKR vs RCB Dream 11 Team prediction

यष्टिरक्षक - फिल सॉल्ट, दिनेश कार्तिक

फलंदाज – विराट कोहली (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, फाफ डू प्लेसिस, आंग्रिश रघुवंशी

अष्टपैलू - सुनील नरेन (कर्णधार), आंद्रे रसेल

गोलंदाज- मिचेल स्टार्क, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल

IPL_Entry_Point