मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs LSG Dream 11 Prediction : कर्णधार-उपकर्णधार कोण असेल? आज ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची टीम

KKR vs LSG Dream 11 Prediction : कर्णधार-उपकर्णधार कोण असेल? आज ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 14, 2024 11:27 AM IST

KKR vs LSG Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा २८ वा सामना आज लखनौ आणि केकेआर यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन कशी असेल ते जाणून घेऊया.

KKR vs LSG Dream 11 Prediction
KKR vs LSG Dream 11 Prediction

KKR vs LSG Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा २८ वा सामना आज (१४ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

ट्रेंडिंग न्यूज

कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संघाने चालू हंगामात ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. पण गेल्या सामन्यात केकेआरला सीएसकेकडून ७ विकेट्सनी मात खावी लागली होती. केकेआरने आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे.

तर दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स सध्या आयपीएल २०२४च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. लखनौ संघाने ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. पण गेल्या सामन्यात लखनौचा दिल्ली कॅपिटल्सकडून ६ विकेट्सनी पराभव झाला होता.

दरम्यान, केकेआर असो की लखनौ, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

KKR vs LSG Dream 11 Prediction

यष्टिरक्षक- केएल राहुल, फिल सॉल्ट

फलंदाज- श्रेयस अय्यर, निकोलस पूरन, क्विंटन डी कॉक

अष्टपैलू - सुनील नरेन, आंद्रे रसेल, मार्कस स्टॉइनिस

गोलंदाज- मोहसीन खान, हर्षित राणा, मिचेल स्टार्क

कर्णधार- केएल राहुल

उपकर्णधार- मार्कस स्टॉइनिस.

कोलकाता नाईट रायडर्सकडे लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करण्याची चांगली संधी आहे. केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. तर लखनौ संघाला दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मयंक यादवची उणीव भासणार आहे.

केकेआर वि. लखनौ हेड टू हेड रेकॉर्ड

केकेआर आणि लखनौ यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. हे तिन्ही सामने लखनौने जिंकले आहेत.

दोन्ही संघ

कोलकाता कोलकाता नाइट रायडर्स स्क्वाड - फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, ेमिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, मानिश शर्मा, सुयश शर्मा. , रहमानउल्ला गुरबाज, साकिब हुसैन, हर्षित राणा, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, नितीश राणा, चेतन सकारिया, शेरफान रदरफोर्ड, अल्लाह गझनफर

लखनौ सुपर जायंट्स स्क्वॉड - केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीप), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, कृष्णा गोमंतक, कृष्णा पंड्या. , मणिमरन सिद्धार्थ, अमित मिश्रा, मॅट हेन्री, मयंक यादव, युधवीर सिंग चरक, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, प्रेरक मंकड, मोहसीन खान, शामर जोसेफ, अर्शिन कुलकर्णी.

IPL_Entry_Point