मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs DC Head to Head: कोलकाता- दिल्लीमध्ये कोणत्या संघाचं पारड जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

KKR vs DC Head to Head: कोलकाता- दिल्लीमध्ये कोणत्या संघाचं पारड जड? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 29, 2024 11:18 AM IST

Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Head to Head Record: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ४७वा सामना खेळला जाणार आहे.

आयपीएल २०२४: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल.
आयपीएल २०२४: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ४७ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असतील. हा सामना आज (२९ एप्रिल २०२४) ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या हंगामात कोलकात्याची कामगिरी चांगली झाली. कोलकात्याने आठपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. तर, दिल्लीने १० पैकी पाच सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता आणि दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघामध्ये आज चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन्ही संघामधील हेट टू हेड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊ.

ट्रेंडिंग न्यूज

MS Dhoni New Look: महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा बदलला लूक; चेन्नई सुपरकिंग्जनं पोस्ट केला फोटो

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण ३३ सामने खेळले गेले. यातील कोलकात्याने १७ सामने जिंकले आहेत. तर, दिल्लीने १५ सामन्यात विजय मिळवला आहे. याशिवाय, एक सामना अनिर्णित ठरला. दोन्ही संघामधील विजयाचे अंतर फार मोठे नाही. या हंगामात दोन्ही संघ एकदा आमनेसामने आले आहेत. या सामन्यात कोलकात्याने दिल्लीचा १०६ धावांनी विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत सात विकेट्स गमावून २७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ १६६ धावांत ऑलआऊट झाला.

GT vs RCB: विल जॅक्स- कोहलीनं गुजरातच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं; १६व्या षटकातच २०६ धावांचं लक्ष्य गाठलं!

खेळपट्टी अहवाल

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरते. मात्र, येथे फिरकीपटू फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या बनवली जात आहे आणि त्याचा पाठलागही होत आहे. अशा स्थितीत हा सामना उच्च धावसंख्येचा ठरू शकतो. नाणेफेक जिंकणारा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.या खेळपट्टीवर विराट कोहलीच्या बॅटमधून मोठी धावसंख्या पाहायला मिळते.

कोलकात्याचा संभाव्य संघ:

सुनील नरायण, फिल सॉल्ट, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, दुष्मंथा चमीरा/मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट प्लेअर: वैभव अरविंद

दिल्लीचा संभाव्य संघ:

जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे/लिझाद विल्यम्स, खलील अहमद, मुकेश कुमार.

इम्पॅक्ट प्लेअर: रसिक सलाम

IPL_Entry_Point