IPL 2025 KKR vs RCB : आयपीएल २०२५च्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य दिले आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांनी १०३ धावांची शानदार भागीदारी करून केकेआरला चांगली सुरुवात करून दिली. पण क्रुणाल पांड्याने ३ बळी घेत आरसीबीला सामन्यात परत आणले आणि केकेआरला केवळ १७४ धावांवर रोखले. केकेआरने ज्या प्रकारे सुरुवात केली, ते पाहता त्यांनी कमीत कमी ५०-६० धावा केल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या १० षटकांत 1१०७ 07 धावा केल्या होत्या, पण शेवटच्या १० षटकांत आरसीबीच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. केकेआरला शेवटच्या १० षटकात केवळ ६७ धावा करता आल्या, याचे श्रेय आरसीबीच्या फिरकीपटूंना आणि विशेषतः कृणाल पांड्याला जाते.
कृणालने कर्णधार रहाणेच्या विकेटसह ३ महत्त्वाचे बळी घेतले. रहाणे बाद झाला तेव्हा केकेआरची धावसंख्या १०.३ षटकांत १०९ धावा होती. फिनिशर चांगली कामगिरी करतील आणि धावसंख्या २०० पार करेल अशी अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही.
व्यंकटेश अय्यर (६), रिंकू सिंग (१२) आणि आंद्रे रसेल (४) हे स्फोटक फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. अंगकृश रघुवंशीने २२ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
क्विंटन डी कॉकची पहिली विकेट ४ धावांवर पडल्यानंतर अजिंक्य रहाणेसह सुनील नरेनने शानदार शतकी भागीदारी केली. रहाणेने आयपीएल २०२५ चे पहिले अर्धशतक झळकावले, त्यासाठी त्याने फक्त २५ चेंडू खेळले.
रहाणेने ३१ चेंडूत ५६ धावा केल्या, ज्यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला कृणाल पांड्याने बाद केले. सुनील नारायणने २६ चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ५ चौकार लगावले. रसिक सलामने त्याला बाद केले
कृणाल पांड्याने ४ षटकात २९ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याने अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांना आपले बळी बनवले.
जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकच्या रूपाने डावातील पहिली विकेट घेतली. त्याने ४ षटकात २२ धावा देऊन २ बळी घेतले. यश दयाल आणि रसिक सलाम यांना १-१ विकेट मिळाली. सुयश शर्मानेही १ बळी घेतला.
संबंधित बातम्या