KKR vs LSG Indian Premier League 2024 : आयपीएल २०२४ च्या २८व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर लखनौने २० षटकात ८ बाद १६१ धावा केल्या.
प्रत्युत्तरात केकेआरने १५.४ षटकात २ गडी गमावून लक्ष्य गाठले. केकेआरकडून सलीमीवीर फिलिप सॉल्टने शानदार फलंदाजी करताना नाबाद ८९ धावा केल्या. ४७ चेंडूंचा सामना करताना त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. श्रेयस अय्यरने नाबाद ३८ धावा केल्या. त्याने ६ चौकार मारले. यादरम्यान लखनौकडून मोहसीन खानने गोलंदाजी करताना २ बळी घेतले.
कोलकाता संघाला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र घरच्या मैदानावर विजय मिळवत संघाने पुनरागमन केले. कोलकाताने आतापर्यंत ५ सामन्यांत केवळ एकच सामना गमावला आहे, तर ४ सामने जिंकले आहेत. KKR ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर KL राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि ६ सामन्यांत ३ विजय आणि ३ पराभवांसह ६ गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, १६२ धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्टशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने ३८ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार मारले.
सुनील नरेन आणि अंगक्रिश रघुवंशी झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले असले तरी फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यर यांनी केएल राहुलच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. लखनौ सुपर जायंट्ससाठी मोहसीन खान हा यशस्वी गोलंदाज होता. या गोलंदाजाने ४ षटकात २९ धावा देत २ बळी घेतले.
त्याआधी, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने २० षटकात ७ गडी गमावून १६१ धावा केल्या.
वास्तविक, लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले, त्यामुळे हा संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. लखनौ सुपर जायंट्ससाठी निकोलस पुरनने ३२ चेंडूत ४५ धावा केल्या. तर केएल राहुलने २७ चेंडूत ३९ धावा केल्या.
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मिचेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. या वेगवान गोलंदाजाने केएल राहुलच्या संघातील ३ फलंदाजांना आपला बळी बनवले. याशिवाय वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
संबंधित बातम्या