मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : रिंकू सिंगने मारलेला चेंडू चिमुरड्याच्या डोक्याला लागला, पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

IPL 2024 : रिंकू सिंगने मारलेला चेंडू चिमुरड्याच्या डोक्याला लागला, पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 13, 2024 03:07 PM IST

Rinku Singh IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सच्या सराव शिबिरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रिंकू सिंगचा आहे.

Rinku Singh रिंकूने मारलेला चेंडू चिमुरड्याच्या डोक्याला लागला, पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा
Rinku Singh रिंकूने मारलेला चेंडू चिमुरड्याच्या डोक्याला लागला, पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

आगामी आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. पण या सामन्यापूर्वी आयपीएलचे सर्व संघ जबरदस्त तयारी करत असून सर्वच संघांची सराव शिबिरं सुरू आहेत.

या दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या सराव शिबिरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रिंकू सिंगचा आहे.

रिंकू सिंगने चाहत्यांची मनं जिंकली

केकेआरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर प्रशिक्षण सत्राचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिक्सर किंग रिंकू सिंग मोठा शॉट खेळतो, पण रिंकूने मारलेला हा चेंडू एका लहान मुलाला लागला. यानंतर रिंकूने लगेच त्या मुलाकडे धाव घेतली आणि त्याची विचारपूस केली.

ऐवढेच नाही तर रिंकू स्वतः त्या मुलाला सॉरीदेखील म्हणाला. यानंतर रिंकूने त्या जर्सी भेट दिली तर केकेआरचा बॅटिंग कोच अभिषेक नायरने मुलाला कॅप भेट दिली.

रिंकू सिंगची आयपीएल कारकीर्द

रिंकू सिंगने २०१८ मध्येच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला खेळण्याची खरी संधी गेल्या वर्षी मिळाली आणि त्याने या संधीचे सोनं केले. रिंकू सिंगने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये एकूण १४ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १४९ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ४७४ धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून ४ अर्धशतकेही झळकली. रिंकूने आपल्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत ३१ सामन्यांत ७२५ धावा केल्या आहेत.

IPL_Entry_Point