मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : क्रिकेटविश्वात खळबळ; स्टार खेळाडूचा आगामी टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार

T20 World Cup 2024 : क्रिकेटविश्वात खळबळ; स्टार खेळाडूचा आगामी टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 23, 2024 06:17 PM IST

T20 World Cup 2024 News : येत्या १ जून २०२४ पासून टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

 यंदाचा टी-२० विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे.
यंदाचा टी-२० विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे.

Sunil Narine: आगामी टी-२० विश्वचषकाला येत्या १ जून २०२४ पासून सुरुवात होणार आहे. चांगला विश्वचषक संघ निवडण्यासाठी निवडकर्ते आयपीएलमध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर नजर ठेऊन आहेत. मात्र, आयपीएल २०२४ मध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या एका अनुभवी खेळाडूने विश्वचषक खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या खेळाडूच्या निर्णयामुळे कोट्यवधी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याशिवाय, संघालाही परिणाम भोगावे लागू शकतात. मात्र, हा खेळाडू आहे तरी कोण? याबाबत आपण जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

CSK vs LSG: चेन्नई-लखनौमध्ये आज रंगणार क्रिकेटचा थरार, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, संभाव्य संघ आणि पीच रिपोर्ट

टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ तयारीला लागले आहेत. यंदाचा टी-२० विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिजला घरच्या मैदानाचा फायदा मिळू शकतो. वेस्ट इंडीजचा संघ आणखी मजबूत करण्यासाठी कर्णधार रोव्हमन पॉवेल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या सुनील नारायणला निवृत्तीतून माघार घेण्याची विनंती केली. मात्र, सुनील नरेनने तसे करण्यास नकार दिला. तो विश्वचषकात वेस्ट इंडीजच्या संघाचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे वेस्ट इंडिज संघासह कोट्यवधी चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

Yuzvendra Chahal 200 Wickets : चतुर चहलचा भीम पराक्रम, आयपीएलमध्ये २०० विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला

सुनील नारायण हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यात चेंडूसोबतच बॅटनेही चमत्कार करण्याची क्षमता आहे. सुनील नारायणने एकूण ५१ टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने ५१ सामन्यांच्या ४९ डावात ५२ विकेट घेतल्या आहेत. १२ धावांत चार विकेट घेणे, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय, त्याने १६९ आयपीएल सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १७२ विकेट्स घेतले आहेत. एक शतक आणि पाच अर्धशतकाच्या मदतीने १ हजार ३३२ धावा केल्या आहेत.

१ जूनपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात

आगामी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला ०१ जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. ०१ जून ते १८ जून या कालावधीत साखळी सामने खेळवले जातील. यानंतर १९ जून ते २४ जून दरम्यान सुपर 8 टप्प्यातील सामने होणार आहेत. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ जून रोजी होणार आहेत. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२४ चा विजेतेपदाचा सामना २९ जून रोजी होणार आहे.

IPL_Entry_Point