मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा मोठा बदल, किरॉन पोलार्डकडे बनला नवा कर्णधार

Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा मोठा बदल, किरॉन पोलार्डकडे बनला नवा कर्णधार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 07, 2024 05:42 PM IST

Kieron Pollard Captain MI Cape Town : किरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये बराच काळ मुंबई इंडियन्सचा भाग होता. आयपीएल २०१० मध्ये किरॉन पोलार्ड पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळला.

Kieron Pollard Captain MI Cape
Kieron Pollard Captain MI Cape (AFP)

mumbai indians captain for sa t20 league : दक्षिण आफ्रिका टी-20 लीगपूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिका T20 लीगमधील मुंबई इंडियन्स केपटाऊनचा कर्णधार राशीद खान ही लीग खेळू शकणार नाही. राशीद खान याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे तो आराम करणार आहे.

राशिद खान न खेळणे हा मुंबई इंडियन्स केपटाऊनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राशिद खानच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स केपटाऊनची कमान किरॉन पोलार्ड (Kieron Pollard Captain MI Cape Town For SA T20 league) सांभाळणार आहे.

राशीद खान स्पर्धेतून बाहेर

किरॉन पोलार्ड आयपीएलमध्ये बराच काळ मुंबई इंडियन्सचा भाग होता. आयपीएल २०१० मध्ये किरॉन पोलार्ड पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळला. यानंतर हा कॅरेबियन खेळाडू आयपीएल २०२२ पर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत राहिला. सध्या किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा भाग आहे. 

याशिवाय दक्षिण आफ्रिका T20 लीगसह जगभरातील अनेक लीगमध्ये किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो.

दक्षिण आफ्रिका T20 लीग कधी सुरू होणार

दक्षिण आफ्रिका T20 लीगचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा १० जानेवारीपासून सुरू होत आहे. त्याच वेळी, १० फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचा अंतिम सामना खेळला जाईल. 

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये एकूण ३४ सामने खेळवले जाणार आहेत. तसेच या मोसमात ६ संघ सहभागी होणार आहेत. पहिला सामना सनरायझर्स इस्टर्न केप आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

दक्षिण आफ्रिका T20 लीगमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल फ्रेंचायझींच्या संघांचा समावेश आहे. 

WhatsApp channel