सेलिब्रेशन तर बघा... टेस्ट करियरची पहिली विकेट घेतल्यानंतर केविन सिंक्लेयरची मैदानात स्टंटबाजी, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  सेलिब्रेशन तर बघा... टेस्ट करियरची पहिली विकेट घेतल्यानंतर केविन सिंक्लेयरची मैदानात स्टंटबाजी, पाहा

सेलिब्रेशन तर बघा... टेस्ट करियरची पहिली विकेट घेतल्यानंतर केविन सिंक्लेयरची मैदानात स्टंटबाजी, पाहा

Jan 26, 2024 05:04 PM IST

AUS vs WI 2ns TEST : कसोटीत शानदार कामगिरी करणारा केविन सिंक्लेयर आणखी एका कारणामुळे चर्चेत आलाा आहे. हे कारण त्याचे विकेट घेतल्यानंतरचे सेलिब्रेशन हे आहे.

Kevin sinclair cartwheel Celebration
Kevin sinclair cartwheel Celebration

Kevin sinclair cartwheel Celebration vs Australia : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात केविन सिंक्लेअरने वेस्ट इंडिजकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या कसोटीतच त्याने अर्धशतक झळकावले आणि गोलंदाजीत एक महत्वाचा विकेट घेतला.

दरम्यान, या कसोटीत शानदार कामगिरी करणारा केविन सिंक्लेयर आणखी एका कारणामुळे चर्चेत आलाा आहे. हे कारण त्याचे विकेट घेतल्यानंतरचे सेलिब्रेशन हे आहे. सिंक्लेयरने आपल्या कसोटी करिअरची पहिली विकेट घेताच अप्रतिम आणि थरारक स्टंट करत सेलिब्रेशन केले.

क्रिकेटच्या मैदानावर हे असे सेलिब्रेशन क्वचितच पाहायला मिळते. केविन सिंक्लेयरने या सामन्यात उस्मान ख्वाजाची विकेट घेतली. ख्वाजाने या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ७५ धावा केल्या.

ख्वाजा सिंक्लेयरच्या फिरकीवर स्लीपमध्ये झेलबाद झाला. यानंतर केविन सिंक्लेयरने कार्टव्हीलचा थरारक नजारा दाखवला. सिंक्लेयरचा कार्टव्हील करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, केविन सिंक्लेयरने मैदानावर अशा पद्धतीने विकेटचे सेलिब्रेशन करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये विकेट घेतल्यानंतर अशी कलाबाजी दाखवली आहे.

 

सिंक्लेअरचे पदार्पणाच्या कसोटी डावात अर्धशतक

ब्रिस्बेन कसोटीत प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजची अवस्था खराब झाली होती. पहिल्या डावात संघाने ६४ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या केविन सिंक्लेअरने वेस्ट इंडिजचा डाव सावरला आणि पहिल्याच कसोटी डावात अर्धशतक झळकावले.

सिंक्लेअरने ९८ चेंडूत ५० धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्याशिवाय जोशुआ डिसिल्वानेही ७९ धावांची खेळी खेळली. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद २८९ धावांवर घोषित केला. वेस्ट इंडिजला पहिल्या डावात २३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजाने ७५ तर अॅलेक्स कॅरीने ४१ चेंडूत ६४ आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद ६४ धावा केल्या.

Whats_app_banner