आयपीएल २०२४ चा २९ सामना रविवारी (१४ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला. या सामन्यात मुंबईचा २० धावांनी पराभव झाला.
दरम्यान, या सामन्यानंतर हार्दिक पंड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. सुनील गावस्कर आणि केविन पीटरसन यांनी हार्दिक पंड्याच्या दिखाऊपणावर सडकून टीका केली आहे.
विशेष म्हणजे, जेव्हा मुंबई इंडियन्सने IPL च्या १७ व्या मोसमासाठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली, तेव्हापासून फ्रँचायझी आणि पंड्या दोघांनाही चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा आयपीएल मोसमही खूपच खराब जात आहे. अशा परिस्थितीत केविन पीटरसन आणि सुनील गावस्कर यांनीही हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या फॉर्मवर जोरदार टीका केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या शतकानंतरही मुंबई इंडियन्सचा सामना २० धावांनी पराभव झाला.
या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याला सर्वांच्याच निशाण्यावर आला हे. त्याला सर्वांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. हार्दिक पंड्यने सीएसेकच्या डावातील २०वे षटक टाकले, या षटकात धोनीने २० धावा कुटल्या. पंड्याने या षटकात २६ धावा दिल्या आणि मुंबईचा पराभव २० धावांनी झाला.
या सामन्यानंतर इंग्लंड संघाचा माजी खेळाडू केविन पीटरसनने हार्दिकवर टीका करत म्हटले की, त्याच्याकडे बघून तो अभिनय आणि दिखाऊपणा करत असल्याचे स्पष्ट होते.
केविन पीटरसनने स्टार स्पोर्ट्सवर हार्दिक पंड्याच्या कॅप्टन्सीबद्दल बोलताना सांगितले की, मला वाटते की सध्या मैदानाबाहेर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत आहे. नाणेफेकीच्या वेळी मी त्याला पाहिले तेव्हा तो जबरदस्तीने हसत असल्याचे स्पष्ट दिसत होते, जणू काही तो अभिनय करत होता. यावेळी तो अजिबात आनंदी नाही. मी तिथे होतो आणि मी सांगू शकतो की त्याचा त्याच्यावर परिणाम होत आहे. धोनी जेव्हा त्याच्या चेंडूंवर षटकार मारत होता, तेव्हा तुम्हाला स्टेडियममध्ये हार्दिकच्या विरोधात आवाज ऐकू येत होता. तोही एक भारतीय खेळाडू आहे आणि त्यालाही भावना आहेत. त्याला अशी वागणूक दिली जात असेल तर त्याच्या खेळावर निश्चितच फरक पडेल".
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही हार्दिक पंड्या हा वाईट गोलंदाज आणि कर्णधार असल्याची जोरदार टीका केली. गावसकर म्हणाले की, मी खूप दिवसांनी इतकी वाईट गोलंदाजी पाहिली आहे. त्याच्या गोलंदाजीवर धोनी सहज षटकार मारत होता, तरीही तुम्ही त्याला त्याच लेन्थवर गोलंदाजी करत आहात, ज्यावर कोणत्याही फलंदाजाने अशा परिस्थितीत चेंडू चाहत्यांपर्यंत पोहोचवू शकतो. गोलंदाजी पूर्णपणे सामान्यपेक्षा कमी होती आणि या सामन्यात त्याची कॅप्टन्सीही अत्यंत खराब होती".